AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Vijay Wedding: रश्मिकाने विजयशी लग्न करताच एक्स बॉयफ्रेंडचा मित्र नाराज; दिली अशी प्रतिक्रिया

Rashmika Vijay Wedding: अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मित्राची नाराजी... असं नक्ती म्हणाला तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका - विजय यांच्या नात्याची चर्चा...

Rashmika Vijay Wedding: रश्मिकाने विजयशी लग्न करताच एक्स बॉयफ्रेंडचा मित्र नाराज; दिली अशी प्रतिक्रिया
Rashmika Vijay Wedding
| Updated on: Feb 27, 2026 | 3:26 PM
Share

Rashmika Vijay Wedding: अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर याठिकाणी मोठ्या थाटात लग्न केलं. आता रश्मिका आणि विजय यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दोघांच्या लग्नात जवळच्या व्यक्तींनी आणि कुटुंबियांनी हजेरी लावली होती. याच दरम्यान, अशा व्यक्तीच्या मित्राची प्रतिक्रिया समोर येत आहे, ज्या व्यक्तीसोबत रश्मिका हिचा साखरपुडा झालेला पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अशात अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मित्राने नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, रश्मिका हिच्या बॉयफ्रेंडच्या मित्राने नाराजी व्यक्त केली आहे.

रश्मिका हिच्या एक्स बॉयफ्रेंडचा मित्र दुसरा तिसरा कोणी नाही तर, ‘कंतारा’ सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आहे. एका कार्यक्रमात ऋषभ शेट्टी याला रश्मिकाच्या लग्नावर विचारण्यात आलं. ऋषभ शेट्टी याला विचारण्यात आलं, रक्षित शेट्टी यांच्याप्रमाणेत धार्मिक सिनेमांच्या निर्मितीकडे तुमचा कल आहे का? यावर ऋषभ शेट्टी म्हणाला, ‘आम्ही सर्व उत्तम कलाकार आहेत. म्हणून वेळ आणि संधी ठरवते काय करणं योग्य राहिल…’, त्यानंतर ऋषभ शेट्टी याला विचारण्यात आलं. ‘रश्मिका हिचं लग्न होत आहे, तुम्हाला निमंत्रण मिळालं आहे का?’ यावर ऋषभ शेट्टी याने कोणतीच प्रतिक्रिया न देता फक्त ‘थँकू यू…’ असं म्हणत निघून गेला…, सध्या ऋषभ शेट्टी याच्या प्रतिक्रियेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

रश्मिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 22 व्या वर्षी रश्मिका हिने अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) याच्यासोबत साखरपुडा केला होता. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर रश्मिका आणि रक्षित यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रश्मिका हिने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रिक पार्टी’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सिनेमात रश्मिका आणि रक्षित यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. आज रश्मिका हिचं नाव बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये देखील फार मोठं आहे.

रश्मिका आणि विजय यांचं लग्न

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी मोठ्या शाही थाटात लग्न केलं. 26 फेब्रुवारी 2026 मध्ये दोघांनी उदयपूर याठिकाणी लग्न केलं. पारंपरिक रितेने दोघे लग्नबंधनात अडकले. सांगायचं झालं तर, गेल्या सात वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. आता त्यांनी नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं आहे.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.