AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी दुर्गंधीत डुकरासारखी राहते.., ‘रोडीज’ विजेतीने दाखवली मुंबईतल्या घराची अवस्था; प्रति महिना देते 70 हजार रुपये भाडं

'सीआयडी'सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली आणि 'रोडीज' या शोची विजेती आंचल खुरानाने तिच्या मुंबईतील घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. दर महिन्याला 70 हजार रुपये भाडं देऊनही ती कोणत्या परिस्थितीत राहते, याची झलक तिने दाखवली आहे.

मी दुर्गंधीत डुकरासारखी राहते.., 'रोडीज' विजेतीने दाखवली मुंबईतल्या घराची अवस्था; प्रति महिना देते 70 हजार रुपये भाडं
रोडीज विजेतीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2026 | 3:18 PM
Share

‘एमटीव्ही रोडीज 8’चा किताब जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आंचल खुराना सध्या तिच्या घरामुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या आंचलने सोशल मीडियावर तिच्या मुंबईतील घराची झलक दाखवली आणि ग्लॅमरच्या दुनियेआड कलाकारांचं आयुष्य किती वेगळं असतं, याची झलक चाहत्यांना दिली. विशेष म्हणजे, मुंबईतील या 1 बीएचके फ्लॅटसाठी आंचल दर महिन्याला तब्बल 70 हजार रुपये भाडं देते. आंचलचा फ्लॅट 13व्या मजल्यावर आहे. मात्र, घराच्या खिडकीतून समुद्र, हिरवळ किंवा एखाद्या आलिशान इमारतींचं दृश्य दिसत नाही. त्याऐवजी समोर मोठ्या प्रमाणात चाळ आणि झोपडपट्टी परिसर दिसतो. त्यामुळे मुंबईसारख्या महागड्या शहरात एवढं भाडं देऊनही मिळणाऱ्या सुविधांबद्दल आंचलने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘या बजेटमध्ये एवढंच मिळतं,’ अशा शब्दांत तिने परिस्थिती सांगितली.

आंचलने घरातील छोटंसं किचनही चाहत्यांना दाखवलं. जागा कमी आणि सामान जास्त असल्यामुळे वॉशिंग मशीनही किचनमध्येच ठेवावी लागते, असं तिने सांगितलं. घरातील बेडरूममध्ये कपडे, बॅग्ज आणि इतर वस्तू ठेवण्यासाठी मर्यादित जागा आहे. तिच्याकडे महागड्या आणि लक्झरी हँडबॅग्स असून तिने त्यांचीही झलक दाखवली. घरात छोटंसं देवघर असून पाहुण्यांसाठी ठेवलेला बेड इतर वेळी कपडे वाळत घालण्यासाठी वापरला जातो.

पहा व्हिडीओ-

सर्वात लक्षवेधी ठरलं ते आंचलचं मुंबईत स्वतःचं घर घेण्याबाबतचं वक्तव्य. मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती आणि मनोरंजन क्षेत्रातील अनिश्चित उत्पन्नाचा संदर्भ देत, स्वतःचं घर घेण्यासाठी आपल्याला 400 ते 500 वर्षे लागतील, असं ती मिश्कीलपणे म्हणाली. तिच्या या वक्तव्यामुळे कलाकारांचं आयुष्य नेहमी दिसतं तितकं आलिशान नसतं, हे पुन्हा समोर आलं. आंचल केवळ घराबद्दलच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीतील संघर्षाबद्दलही बोलली. ऑडिशन देऊनही अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागतो, काम टिकवण्यासाठी मोठा ताण असतो आणि कलाकारांची सतत इतरांशी तुलना केली जाते, असं तिने सांगितलं.

आंचल खुराना सध्या ‘तू ज्युलिएट जट्ट दी’ या मालिकेत काम करत आहे. ‘रोडीज’मधून मिळालेली ओळख आणि अनेक वर्षांचा टीव्ही इंडस्ट्रीतील अनुभव असूनही मुंबईत स्वतःचं घर घेणं तिच्यासाठी अजूनही मोठं स्वप्न आहे. त्यामुळे तिच्या घराचा हा व्हिडीओ केवळ हाऊस टूर न राहता, मुंबईत स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांच्या वास्तवाची झलक दाखवणारा ठरला आहे.

Follow Us
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक