उशाखाली तिचा फोटो, डोळ्यांत तिची स्वप्नं! मराठी चित्रपटातील ‘या’ प्रेमगीताची तरुणाईला भयंकर क्रेझ

प्रेमात पडल्यावर आवडत्या व्यक्तीची आठवण प्रत्येक क्षणाला येत राहते. तिच्या सहवासाची ओढ आणि मनात रंगणारी स्वप्नं यांचं सुंदर भावविश्व अगदी ग्रामीण बाजामध्ये या मराठी गाण्यामध्ये पहायला मिळते. कोणते आहे हे गाणे?

उशाखाली तिचा फोटो, डोळ्यांत तिची स्वप्नं! मराठी चित्रपटातील या प्रेमगीताची तरुणाईला भयंकर क्रेझ
Marathi Romantic Song
Image Credit source: social media
| Updated on: Oct 28, 2026 | 10:42 PM

प्रेमात पडल्यावर माणसाचं जगच बदलून जातं. आवडत्या व्यक्तीचा फोटो जवळ ठेवणं, तिच्या आठवणीत रमणं आणि ती कधी भेटेल याची वाट पाहणं… प्रेमातल्या या छोट्या छोट्या गोष्टी मनाला वेगळाच आनंद देतात. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘साज ह्यो तुझा’ हे गाणं अशाच प्रेमभावना व्यक्त करतं. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बबन’ चित्रपटातील या गाण्याने आपल्या खास ग्रामीण बाजामुळे आणि सुरेल संगीतामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. गाण्याचे शब्द ऐकताना प्रेमात पडलेल्या तरुणाच्या मनातील भावना खरोखर अशाच असतात, अशी प्रचीती येते.

प्रेमात गुंतलेल्या मनाची गोष्ट

‘साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला गं’ या बोलांमधूनच गाण्याची भावना लक्षात येते. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आठवणीत रमणं, तिच्या सहवासाची ओढ लागणं आणि तिलाच आपल्या आयुष्याचा भाग बनवण्याची इच्छा या गाण्यातून व्यक्त होते. रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या गोष्टींमधून प्रेमाची खोली दाखवणारे हे बोल आहेत. त्यामुळे प्रेमाचा अनुभव घेतलेल्या अनेक प्रेक्षकाना हे गाणं आपलंसं वाटतं. या गाण्याला यूट्यूबवर तब्बल 117 मिलियन व्ह्यूज आहेत.

Loading...

ओंकारस्वरूप यांच्या आवाजाची जादू

या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. ओंकारस्वरूप यांनी या गाण्याला आवाज दिला असून, संगीतही त्यांनीच तयार केलं आहे. गीतकार सुहास मुंडे यांनी लिहिलेल्या बोलांमुळे गाण्याला ग्रामीण मातीचा गंध लाभला आहे. गाण्यातील शब्द, सुरेल चाल आणि वाद्यांचा वापर यामुळे प्रेमाची भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होते.

 

‘बबन’ चित्रपटातील प्रेमकथा

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ग्रामीण भागातील तरुणाचं आयुष्य, त्याची स्वप्नं आणि प्रेम यांचा प्रवास चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

‘साज ह्यो तुझा’ या गाण्यातील प्रेमभावना आणि ग्रामीण भाषेचा गोडवा यामुळे ते चित्रपटातील लक्षात राहणाऱ्या गाण्यांपैकी एक ठरलं. शहरी प्रेमगीतांपेक्षा वेगळा बाज असलेल्या या गाण्यातून ग्रामीण प्रेमाची निरागसता अनुभवायला मिळते.

गाण्याचे बोल

साज ह्यो तुझा
जीव माझा गुंतला गं

उशाखाली फोटो तुझा चांदरातीला
तुझ्या वेणीतलं फुल माळून विसावलं मन
त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग

मृगनयनीया हाक दे मला
रोज मी उभा त्या वाटलादेसी गाणी ऐका

फुल झालो मी
गंध हो ना तू
सांजयेळच माझं गाणं हो ना तु
तुझ्या सावलीत आज ग
निजलोय गार ग
झेलतोय रोजचा त्या उन्हाला गं

आभाळ फिरून येईल
ढग दाटून येतील ग
मनातल्या हुंद्क्याचा
डोळ भरल्या पाण्याचा
रंग कोणता ह्यो सांग मातीला गं

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us