AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सेक्रेड गेम्स’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर; रुटीन चेकअपसाठी गेली अन्..

'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचं निदान झालं आहे. राजश्रीने इन्स्टाग्रामवर रुग्णालयातील फोटो पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे.

'सेक्रेड गेम्स' फेम मराठमोळ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर; रुटीन चेकअपसाठी गेली अन्..
राजश्री देशपांडेImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 2:07 PM
Share

‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमधअये नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारलेली मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे. राजश्री रुटीन चेकअपसाठी गेली असता तिला ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. त्यासाठी तिने उपचार घेतले असून नुकतीच तिच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील फोटो पोस्ट करत राजश्रीने कॅन्सरशी कशी झुंज दिली, याविषयी सांगितलं.

राजश्री देशपांडेची पोस्ट-

‘तुम्ही ही पोस्ट वाचत आहात, याचा अर्थ असा की मला माझ्या पालकांना सांगण्याची हिंमत झाली आहे की मला इन्फिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा (NOS) हा ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. आता तुम्हा सर्वांना हे कळण्याची वेळ झाली आहे. सुदैवाने रुटीन चेकअपदरम्यान त्याचं निदान झाल्याने त्याच्याशी झुंज देण्याची संधी मिळाली. असंख्य टेस्ट आणि सर्जरीमुळे हा प्रवास बऱ्याच चढउतारांचा होता, पण प्रत्येकाच्या प्रेमामुळे मी याचा सामना करू शकले. सर्जरीनंतर आई आणि पप्पांचा चेहरा पाहून माझ्यातील भीतीचं एका अतूट शक्तीत रुपांतर झालं. प्रत्येकाने दिलेल्या पाठिंब्यामुळे मला प्रचंड बळ मिळालं आहे. आता मी त्यातून बरी होत असून लवकरच रुग्णालयातून घरी परतणार आहे,’ असं राजश्रीने लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

View this post on Instagram

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

राजश्री अभिनयासोबतच तिच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखली जाते. 2026 मध्ये बरीच सामाजिक कामं मार्गी लावण्याचा तिचा प्लॅन होता, आणि ठरल्याप्रमाणे ते पूर्ण करणार असल्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. इन्स्टाग्रामवरील आणखी एका पोस्टमध्ये राजश्रीने लिहिलंय, ‘2026 ची सुरुवात ग्रामीण भागातील आणखी दोन शाळांचं नियोजन, नदीचा आणखी एक भाग पुनरुज्जीवित करणं आणि काही अत्यंत प्रतिभावान लोकांच्या कथा शूट करण्याच्या प्लॅनिंगपासून झाली होती. उद्देश आणि स्वप्नांनी मी सज्ज होते. पण यात काहीही बदलणार नाही. हे सर्व शक्य होईल आणि तेही ठरल्यापेक्षा अधिक चांगल्या मार्गांनी. मी वचन देते. या धाडसी प्रवासात मी विश्वास, धैर्य आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाने पाऊल ठेवत आहे. हा फक्त एक धडा आहे, संपूर्ण कहाणी नाही. आता कॅन्सरशी लढा दिलेली, सामाजिक कार्यकर्ती आणि माणूस म्हणून हे सर्व अधिक महत्त्वाचं झालं आहे. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी आता बऱ्याच ग्राऊंड वर्कची गरज आहे.’

Follow Us
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?