AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saina teaser out : परिणीती चोप्राचा जबरदस्त लूक, पाहा ‘सायना’चा धमाकेदार टीझर!

पोस्टर आणि लोगोच्या वादात अडकलेल्या ‘सायना’ या चित्रपटाचा टीझर (Saina teaser out ) आज (4 मार्च) प्रदर्शित झाला आहे.

Saina teaser out : परिणीती चोप्राचा जबरदस्त लूक, पाहा ‘सायना’चा धमाकेदार टीझर!
सायना चित्रपट
| Updated on: Mar 04, 2021 | 4:13 PM
Share

मुंबई : पोस्टर आणि लोगोच्या वादात अडकलेल्या ‘सायना’ या चित्रपटाचा टीझर (Saina teaser out ) आज (4 मार्च) प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे. या चित्रपटात ती ‘भारताची फुलराणी’ अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या भूमिकेत दिसणार आहे (Saina teaser out watch parineeti chopra amazing look and dialogue).

अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट 26 मार्च रोजी सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरूवात एका जबरदस्त संवादाने होते. सायनाच्या भूमिकेतील परिणीती म्हणते, ‘जब माता-पिता अपने बेटों को शिक्षित करना चाहते हैं और अपनी बेटियों की शादी 18 साल की उम्र तक करना चाहते हैं, तब उसने बर्तनों के बजाय एक रैकेट उठाया और खुद ही अपना भाग्य बना लिया.’ अर्थात ‘जेव्हा पालकांना आपल्या मुलास शिक्षण द्यावे आणि आपल्या मुलींचे वयाच्या 18व्या वर्षी लग्न करावे वाटते, तेव्हा तिने भांडयांऐवजी रॅकेट उचलले आणि स्वतःचे भविष्य घडवले.’

परिणीती चोप्राने इंस्टाग्रामवर शेअर केला दमदार टीझर

भारताच्या ‘फुलराणी’ची कथा

या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सायनाची कामगिरी आणि तिच्या संघर्षाची कहाणी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर करत परिणीतीने “सायनाचा टीझर, आता ट्रेलरही लवकरच!” असे कॅप्शन लिहिले. परिणीतीशिवाय बँडमिंटनपटू सायना नेहवालनेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर हा टीझर पोस्ट केला आहे. तिच्या स्वत:च्या संघर्षांवर आधारित या सिनेमाचा तिला प्रचंड अभिमान वाटतो. हा तिच्यासाठी देखील एक भावनिक क्षण आहे. याचा उल्लेख त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला होता (Saina teaser out watch parineeti chopra amazing look and dialogue).

पोस्टरवर उडाला गोंधळ

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट अनेक वृत्तांमुळे चर्चेत आला आहे. याच्या पोस्टरवरुण लोकांनी दिग्दर्शक, निर्माता आणि संपुर्ण कास्टला जोरदार ट्रोल केले होते. वास्तविक, सोशल मीडियावर शेअर केलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये उपस्थित असलेल्या लोगोवर प्रत्येकाने प्रश्न उपस्थित केले होते. नेटकऱ्यांच्या मते, पोस्टरवर असलेला लोगो बॅडमिंटन नव्हे, तर टेनिसचा खेळ दर्शवतो. कारण बॅडमिंटनमध्ये शटल कधीच त्या पद्धतीने उडवले जात नाही. पोस्टरमध्ये दर्शवलेल्या हाताचा हावभाव टेनिस सर्व्ह सारखा आहे.

परिणीती चोप्रा चित्रपटांमध्ये व्यस्त!

गत वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘केसरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतला होता. 21 शूर शिखांच्या शौर्याची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून बहुमान मिळवला होता. ‘केसरी’ने पहिल्याच दिवशी 21.06 कोटी रुपयांची विक्रमी कमाई होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16.70 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 18.75 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 21.51 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सध्या परिणीती चोप्रा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’च्या कामात व्यस्त आहे.

(Saina teaser out watch parineeti chopra amazing look and dialogue)

हेही वाचा :

Video : जान्हवी कपूरच्या पहिल्याच आयटम साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.