Rakhi Sawant Cheating Case | राखी सावंतसह भावावरही FIR दाखल, वाचा काय आहे ‘हे’ प्रकरण?

‘बिग बॉस 14’मधून बरीच प्रसिद्धी मिळावल्यानंतर अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आता फसवणूकीच्या प्रकरणात अडकली आहे.

Rakhi Sawant Cheating Case | राखी सावंतसह भावावरही FIR दाखल, वाचा काय आहे ‘हे’ प्रकरण?
राखी सावंत
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 5:43 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’मधून बरीच प्रसिद्धी मिळावल्यानंतर अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आता फसवणूकीच्या प्रकरणात अडकली आहे. दिल्लीतील विकास पुरी भागातील सेवानिवृत्त बँकेच्या कर्मचाऱ्याने राखी सावंत, तिचा भाऊ राकेश सावंत याच्याविरूद्ध सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात स्वतःचे नाव आल्यानंतर राखी सावंत खूपच नाराज झाली आहे. आता तिने तक्रारदाराविरूद्धच मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे (Rakhi Sawant Cheating Case retired bank officer shailesh shrivastva files complaint against rakhi).

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार राखी सावंत, तिचा भाऊ आणि राज खत्री यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी चित्रपट बनवण्याच्या वेळी शैलेश श्रीवास्तव नावाच्या सेवानिवृत्त बँकेच्या कर्मचार्‍यांकडून सहा लाख रुपये उधार घेतले होते. या प्रकरणात राखी सावंत हीच्यावरही आरोप लावण्यात आला आहे की, तिने शैलेशला या पैशातून विकास पुरीमध्ये नृत्य शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. राखी सावंत यांची बहीणसुद्धा यात सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व योजनांपैकी एकही पूर्ण झालेली नसून, त्यापैकी एकही पैसा त्याला कधीही परत मिळालेला नाही.

‘या’ प्रकरणामुळे राखी झाली दुःखी!

या अहवालानुसार राखी सावंत यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, राखी यामुळे निराश झाली आहे आणि तिला ज्या आरोपांचा सामना करावा लागला आहे, ते पूर्णपणे निराधार आहेत. वास्तविक राखी ही शैलेश श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीला ओळखही नाही. राखीचा जवळचा मित्र म्हणाला की, बिग बॉसनंतर पुन्हा एकदा राखीच्या कारकीर्दीला वेग आला आहे, अशा परिस्थितीत तिची दखल सर्वत्र घेतली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात तिचे कुटुंब लवकरच मोठा निर्णय घेणार आहे.

सध्या राखी सावंत या प्रकरणात बर्‍याच लोकांच्या भेटी घेत आहे. दुसरीकडे आईची तब्येत अत्यवस्थ असल्याने तिची काळजी देखील राखी घेत आहे. या संदर्भात बोलताना राखी म्हणाली, ‘जर 2017मध्ये एखाद्याची फसवणूक झाली असेल, तर तो इतका दिवस कशाची वाट पाहत होता. तो कायदेशीर खटला दाखल करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या समाप्तीची वाट पहात होता का? आम्ही देखील या प्रकरणात आता कायदेशीररित्या निर्णय घेणार आहोत’ (Rakhi Sawant Cheating Case retired bank officer shailesh shrivastva files complaint against rakhi).

राखीच्या भावाचे स्पष्टीकरण

या प्रकरणात राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत तिच्या बचावासाठी पुढे आला आहे. या प्रकरणात राखीचा काही संबंध नाही, हे प्रकरण त्याचे आणि मित्र राज खत्री यांच्याशी संबंधित असल्याचे, त्याने म्हटले आहे. राकेशने सांगितले की, आपल्याला आणि राजला दिल्ली येथे एक संस्था सुरू करायची आहे, परंतु जेव्हा त्याच्या आईची तब्येत ढासळली, तेव्हा ते तिच्या उपचारासाठी तातडीने मुंबईला आले.

तो म्हणाला की, यानंतर जेव्हा तो दिल्लीला परत गेला, तेव्हा त्याला त्याचा साथीदार राज यांने फसवले असल्याचे समजले. त्याच्या ऑफिसमधून चेकबुकही गायब आहे. या संदर्भात त्याने एक दिल्ली आणि एक मुंबईत असे दोन एफआयआर दाखल केले आहेत.

(Rakhi Sawant Cheating Case retired bank officer shailesh shrivastva files complaint against rakhi)

हेही वाचा :

Jalgaon rape case | फोटोसेशनच्या नावे लॉजवर अत्याचार, जळगाव सेक्स स्कँडलवर आधारित गाजलेली ‘लज्जा’ मालिका

Video | नव्या वहिनीसाहेबांचा बिग बींच्या ‘जुम्मा-चुम्मा’वर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा’!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.