Video : विकास गुप्ताने रुग्णालयात जाऊन घेतली राखीच्या आईची भेट, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) ची स्पर्धक अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून तिच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:47 PM, 2 Mar 2021
Video : विकास गुप्ताने रुग्णालयात जाऊन घेतली राखीच्या आईची भेट, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले...

मुंबई : ‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) ची स्पर्धक अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून तिच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले आहे. राखी सावंतची सर्वात जवळची व्यक्ती अर्थात तिची आई सध्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. राखी सावंतने तिच्या आईसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. (Vikas Gupta shared a video with Rakhi Sawant’s mother on social media)

विकास गुप्ताची इन्स्टा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Gupta (@lostboyjourney)

त्यामध्ये राखीची आई सलमान खानचे आभार मानताना दिसत होती. तर आता राखीच्या आईला रुग्णालयात भेटण्यासाठी अभिनेता विकास गुप्ता पोहोचला होता. विकासने याचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर शेअर केले आहेत. विकासने रुग्णालयात राखीच्या आईसोबत खूप गप्पा देखील मारल्या. विकासने व्हिडीओ शेअर करताना विकासने लिहिले आहे की, ‘halle berry तू आता बाजूल हो कारण बाल्ड लूकमध्ये कूल अंदाज घेऊन राखी सावंतची आई येत आहे.

काकी तुमची प्रकृती लवकरच ठिक होईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या विकासचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी आईचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोत राखीच्या आजारी आईचीच्या वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या. राखी सावंतने आपल्या आईचे फोटो शेअर केले होते आणि प्रियजनांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते. फोटो शेअर करताना राखीने लिहिले होते की, प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे.

सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता. या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते.

संबंधित बातम्या : 

ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ

शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका, मुंबईतील खटले हिमाचलला हलवा, कंगनाची याचिका

परिणीती चोप्राचा ‘सायना’ चित्रपट ‘या’ तारखेला चाहत्यांच्या भेटीला!

(Vikas Gupta shared a video with Rakhi Sawant’s mother on social media)