Video : राखी सावंतच्या मदतीला धावून गेला सोहेल खान, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) ची स्पर्धक अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून तिच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले आहे.

Video : राखी सावंतच्या मदतीला धावून गेला सोहेल खान, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

मुंबई : ‘बिग बॉस 14’(Bigg Boss 14) ची स्पर्धक अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून तिच्या आयुष्यात खूप मोठे संकट आले आहे. राखी सावंतची सर्वात जवळची व्यक्ती अर्थात तिची आई सध्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. (Sohail Khan’s video goes viral on social media)

राखी सावंतने तिच्या आईसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये राखीची आई सलमान खानचे आभार मानताना दिसत होती. त्यानंतर राखीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये सोहेल खान या व्हिडीओमध्ये राखीला म्हणत आहे की, माय डिअर राखी, तुला आणि तुझ्या आईला कुढल्याही प्रकारची गरज लागत असेलतर, तू सरळ मला फोन कर…मी तुझ्यासोबत आहे.

मी तुझ्या आईला भेटलो नाही पण मला हे नक्की माहिती आहे की, राखी स्ट्रॉन्ग आहे मग तुझी आईही तुझ्यापेक्षाही स्ट्रॉन्ग असणार…मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल आणि सर्व व्यवस्थित होईल. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी आईचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोत राखीच्या आजारी आईचीच्या वेदना स्पष्टपणे दिसून येत होत्या. राखी सावंतने आपल्या आईचे फोटो शेअर केले होते आणि प्रियजनांना आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते.

फोटो शेअर करताना राखीने लिहिले होते की, प्लीज, माझ्या आईसाठी प्रार्थना करा, तिच्यावर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहे. सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता. या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते.

संबंधित बातम्या : 

आई अमृतासह सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफला, पाहा माय-लेकींचे फोटो!

अभिनेत्री लिसा हेडनने बेबी बंपसोबत केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं…

(Sohail Khan’s video goes viral on social media)

Published On - 9:15 am, Sat, 27 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI