अभिनेत्री लिसा हेडनने बेबी बंपसोबत केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:13 PM, 26 Feb 2021
अभिनेत्री लिसा हेडनने बेबी बंपसोबत केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव असते. लिसा हेडनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना एक गुड न्यूज दिली होती. लिसा आता तिसऱ्यांदा आई होणार आहे. सध्या सोशल मीडियावर लिसाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून यामध्ये लिसा बेबी बंपसोबत डान्स करत आहे. (Lisa Haydon dances with Baby Bump)

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

लिसाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे की, भवतेक नंतर हा व्हिडीओ डिलीट करेन. पण मी म्हणते की, तुम्ही व्हिडीओ पाहाच” लिसाच्या या धमाल व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडीओमध्ये लिसाने बेबी बंपसोबत धमाल डान्स केल्याचं दिसतंय.

याच सोबत लिसाने जिममधील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. यात ती वर्कआउट करताना दिसत आहे. लिसा हेडन कायमच तिच्या फिटनेवर लक्ष देते. व्यायाम आणि योगा करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

शिवाय तीसऱ्या प्रेग्नेंसीची बातमीदेखील खास पद्धतीने तिने चाहत्यांसोबत शेअर केली. लिसाने आपल्या करीयर सुरूवात ‘आयशा’ चित्रपटाने केली होती. त्यानंतर ‘क्वीन’, ‘हाउसफुल 3’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा हिट चित्रपटांमध्ये लिसाने काम केलं आहे. मात्र, लिसा आता परत कधी कमबॅक करणार याची वाट चाहते आतुरतेने पाहात आहेत.

संबंधित बातम्या : 

Pathan : सलमान खान कामाला लागला; ‘पठाण’चे शुटिंग सुरू

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं…

Video : बाॅलिवूडचा दबंग खान राखीच्याही मदतीला गेला धावून, आईने मानले आभार!

(Lisa Haydon dances with Baby Bump)