Maharashtra News LIVE : मंत्रालयसुद्धा आता लाचेपासून सुरक्षित राहिलेले नाही : संजय शिरसाट
Maharashtra News LIVE Updates: राज्यातील 900 दिव्यांग कल्याण संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तर परभणीत उद्धवसेनेचे सय्यद इकबाल हे महापौरपदी विराजमान झाले आहेत. अजितदादांच्या विमान अपघातापूर्वीच्या घटनाक्रमावरून नेत्यांची जुगलबंदी दिसून आली.

LIVE NEWS & UPDATES
-
गोरेगावच्या ४५ मजली इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील गोकुळधाम परिसरातील ४५ मजली डीबी वुड इमारतीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील एका घराच्या बेडरूममध्ये लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीतील अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रहिवाशांना इमारतीच्या गच्चीवर आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. सुदैवाने, या घटनेत कोणालाही इजा झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.
-
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात
तब्बल 1 कोटी रुपये खर्चून शिवस्मारकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. दरवर्षी शिवजयंती निमित्त लाखोंच्या उपस्थितीत पाळणा सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे रुपडे आता पालटले असून दिमाखदार अशे स्मारक उभारण्यात आलेय. या स्मारकाच्या बाजूने आकर्षण विद्युत रोषणाई, शास्त्रधारी मावळे आदी असणार आहेत. सोलापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
-
-
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात अपघात
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात अपघात झाला आहे. पुढे चालणाऱ्या इको गाडीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक देऊन वाहन पसार झालेला आहे. अपघातात एक जण गंभीर तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीम व महामार्ग पोलिसांनी जखमींना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांचा मोलाचा सल्ला
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना मोलाचा सल्ला दिला आहे. सुनेत्रा वहिनी यांनी पालकमंत्री म्हणून पुण्यात बैठक घेतली असे सांगत अजित दादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्मण केला होता. तो धाक आता सुनेत्रा वहिनी यांनी निर्माण करावा असे आवाहन त्यांना ऑनलाईन बैठकीमध्ये केल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना केले.
-
चंद्रपूरसाठी वेड अँड वॉचची भूमिका… थोडं थांबा – संजय राऊत
चंद्रपुरात जे काही घडलं, त्यात उद्धव ठाकरेंची भूमिका नाही… भाजपसोबत जाण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका नाही आणि घेणारही नाही… पक्षात कोणीही चंद्रपूरच्या घडामोडीचं समर्थन केलेलं नाही… चंद्रपूरवरुन आम्ही नक्की जाब विचारू… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
-
जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची सुनेत्रा पवार घेणार भेट….
जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची सुनेत्रा पवार भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सर्किट हाऊसमध्ये उपस्थित आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांना सुनेत्रा पवार भेटणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष कोण करायचा? यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
ग्रामीण पोलिसांचा “हम करे सो कायदा”? नागरिकांचा संताप उसळला
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात पोलिसांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील मादनी गावात चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर पंचनामा करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांशी अरेरावी व शिवीगाळ केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी पंचनामा करताना कोऱ्या कागदावर सही घेण्याचा प्रयत्न झाल्याने काही नागरिकांनी आक्षेप नोंदवला.
-
-
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात अपघात
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात अपघात. पुढे चालणाऱ्या इको गाडीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिली धडक. धडक देऊन वाहनचालक पसार. अपघातात एक जण गंभीर तर तीन ते चार जण किरकोळ जखमी. रूट पेट्रोलिंग टीम व महामार्ग पोलिसांनी जखमींना पुढील उपचारासाठी केले ग्रामीण रुग्णालयात दाखल.
-
मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्राचे वाटप
हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यात आतापर्यंत 310 कुणबी प्रमाणपत्राचे वाटप. सर्वाधिक परभणी जिल्ह्यात 160 कुणबी प्रमाणपत्राचे वाटप.710 अर्जांपैकी 310 अर्जांना मंजुरी 24 अर्ज फेटाळले, उर्वरित अर्जांची छाननी सुरू.
-
डोंबिवलीत रिक्षा चालकाने जादा भाड्यावरून 62 वर्षीय वृद्धेला ढकललं
डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावर जादा भाड्यावरून रिक्षा चालकाचा संताप. १२० ऐवजी १६० रुपये घेतल्यानंतरही ६२ वर्षीय वृद्धेशी वाद. भररस्त्यात दिला धक्का. ६२ वर्षीय रिजा जोसेफ या घटनेत जखमी झाल्या असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मानपाडा पोलीस ठाणे येथे रिक्षा चालकाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल.
-
सोलापूर शहरातील रस्त्यांसाठी डीपीडीसीतून निधी
सोलापूर शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी डीपीडीसीतून निधी मिळणार आहे. आमदार देवेंद्र कोठे यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मान्य करण्यात आली आहे. रस्त्यांसाठी आमदारांनी केलेल्या वाढीव निधीच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तात्काळ होकार दिला आहे. राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्यता दिली.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसर्या सर्वसाधारण सभेची तयारी
महानगरपालिकेच्या दुसर्या सर्वसाधारण सभेची तयारी सुरू आहे. नवनिर्वाचित ११५ नगरसेवकांची दुसरी सर्वसाधारण सभा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या सभेत १६ सदस्यीय स्थायी समितीची निवड केली जाणार आहे. त्याआधी सर्व पक्षांनी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करणे बंधनकारक असून, संख्याबळानुसार सदस्यांची निवड होईल. १० फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या सभेत केवळ महापौर व उपमहापौरांची निवड झाली होती.
-
सोमवारी स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीसाठी नाशिकमध्ये महासभा
नाशिकमध्ये स्थायी महत्त्वाच्या असलेल्या समितीसाठी १६ सदस्यांची नियुक्ती सोमवारी विशेष महासभेत होणार आहे. महापौर हिमगौरी आडके यांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेतली. सदस्य निवडीची तारीख घोषित झाल्याने इच्छुक नगरसेवकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. स्थायी समितीच्या सभापतिपदाबरोबरच सदस्यपदासाठी चुरस दिसली. सभापतीपदाची भाजपला संधी मिळाली आहे.
-
मनपा स्वीकृत सदस्यांसाठी-खासदारांच्या आप्तेष्टांना मनपात नो इन्ट्री
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत यशानंतर आता भाजपमध्ये स्वीकृत सदस्यपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.पाच जागांसाठी तब्बल १५० हून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने पक्षात उत्सुकता वाढली आहे. यावेळीही मंत्री, खासदार आणि आमदारांच्या आप्तेष्टांना संधी न देता निष्ठावान कार्यकर्त्यांनाच प्राधान्य देण्याची शक्यता आहे. घराणेशाहीला आळा घालण्याच्या भूमिकेवर पक्ष ठाम असल्याची चर्चा आहे.
-
अतिवृष्टी झालेल्या भागात भागात सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
धाराशिव-अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले. केंद्रीय पथक प्रमुख सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यतील भूम आणि परंडा तालुक्यातील काही गावांना या पथकाने भेटी दिल्या. या पथकाने बाधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी केली. भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) तर परंडा तालुक्यातील आवार पिंपरी या गावांमध्ये केंद्रीय पथकाने पाहणी केली
-
जैतापूर येथे बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी; मोठ्या कारवाईची शक्यता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर येथे बारावीच्या परीक्षेदरम्यान सीसीटीव्ही देखरेखीखालीच सामूहिक कॉपी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संबंधित संस्थाचालक व शिक्षकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य मंडळाकडे पाठविण्यात आला असून, विभागीय समितीमार्फत सखोल चौकशी होणार आहे. दोषी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यासह कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
-
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे. महाशिवरात्रीला रविवारी पहाटे ४ वाजेपासून ते सोमवारी रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीला व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील पूर्णपणे बंद राहणार आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताच्या एक दिवस अगोदर काय घडामोडी घडल्या. दादांना का उशीर झाला यावरून आता वातावरण तापले आहे. या घटनाक्रमवरून दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत असा सवाल करण्यात येत आहे. तर दादांना कुणाचा फोन आला, त्यांना कोणत्या फाईलवर स्वाक्षरीसाठी उशीर झाला यावरून राजकारण तापले आहे. तर दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी राज्यातील 900 बोगस संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा धाडसी निर्णय सरकारने घेतला आहे. परभणीच्या महापौरपदी उद्धव सेनेचे सय्यद इकबाल हे विराजमान झाले आहेत. केंद्र सरकारने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा निर्णय घेतला आहे.
Published On - Feb 13,2026 8:05 AM
