AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Election Result : बांग्लादेश निवडणुकीचा निकाल जाहीर, पाकिस्तानसाठी बॅड न्यूज, भारतासाठी त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी

Bangladesh Election Result : बांग्लादेशात काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. बांग्लादेशच्या या निवडणुकीवर भारत, पाकिस्तान आणि चीन या तिन्ही देशांचं लक्ष होतं.

Bangladesh Election Result : बांग्लादेश निवडणुकीचा निकाल जाहीर, पाकिस्तानसाठी बॅड न्यूज, भारतासाठी त्यातल्या त्यात दिलासादायक बातमी
BNP Tariq Rahman
| Updated on: Feb 13, 2026 | 7:48 AM
Share

बांग्लादेशात काल सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. मागच्यावर्षी शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल केल्यानंतर या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली होती. सध्या बांग्लादेशात युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आहे. बांग्लादेशात काल मतदान झाल्यानंतर काही वेळाने मतमोजणीला सुरुवात झाली होती. आज सकाळपर्यंत बांग्लादेशात निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. बांग्लादेश राष्ट्रवादी पार्टीने (BNP) आपला जुना सहकारी पक्ष जमात-ए-इस्लामीवर मात केली आहे. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेगम खालिदा जिया यांची पार्टी बीएनपी जवळपास 20 वर्षानंतर सरकार बनवण्याच्या स्थितीत आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, बांग्लादेश निवडणूक निकालात बीएनपीने बहुमत मिळवलं आहे. BNP ने 211 जागांवर विजय मिळवला आहे. त्याचवेळी जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथी विचारधारा असलेल्या पक्षांना जनतेच समर्थन मिळालेलं नाही. शेख हसीना तिथे नाहीयत. अवामी लीगवर निवडणूक लढवण्यावर बंदी होती. अशा स्थितीत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीमध्ये थेट सामना झाला. बांग्लादेशच्या या निकालाचा भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथीय विचारधारेच्या पक्षाचा पराभव होणं ही चांगली बाब आहे. पाकिस्तानला धक्का यासाठी आहे कारण त्यांना बांग्लादेशात कट्टरपंथीय विचारधारेच सरकार हवं होतं. बीएनपी बरोबर भारताचे अवामी लीग पार्टी इतके चांगले संबंध नाहीयत. पण अजेंडा विकासाचा असल्याने या संबंधात सुधारणा होऊ शकते.

कुठल्या पक्षाला किती जागा?

बीएनपी आघाडीला 211 जागा, जमातला 70 आणि अन्यनी 6 जागा जिंकल्या आहेत. एकूण 299 मतदार संघांपैकी 287 मतदारसंघात मतमोजणी पूर्ण झालीय. रिपोर्टवरुन बीएनपीने ही निवडणूक जिंकल्याचे संकेत मिळत आहेत. बीएनपीचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पुत्र तारिक रहमानने आपला गृह जिल्हा बुगुरामधून निवडणूक जिंकली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. निवडणूक अधिकाऱ्यानुसार, रहमान यांना 2,16,284 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार आबिदुर रहमान यांना 97,626 मतं मिळाली.

जमात-ए-इस्लामीचा अध्यक्ष निवडणूक जिंकला का?

बीएनपीने आधीच घोषणा केली होती की, जर सत्तेमध्ये आलो तर रहमान बांग्लादेशचे पुढचे पंतप्रधान होतील. त्याच बरोबर युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचं 18 महिन्याचं शासन संपुष्टात येईल. ढाक्यामधून जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष शफीकुर रहमान यांना अनौपचारिकरित्या विजेता घोषित करण्यात आलं आहे. त्यांना 82,645 मतं मिळाली. बीएनपीच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 61,920 मतं मिळाली.

बांग्लादेशच्या स्वातंत्र्याला केलेला विरोध

जमात-ए-इस्लामीने 1971 च्या मुक्ती संग्रामात पाकिस्तान सोबत युद्धाचा, बांग्लादेश स्वातंत्र्याचा विरोध केला होता. 67 वर्षीय प्रमुख शफीकुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष बांग्लादेशात पहिलं इस्लामी नेतृत्व असलेलं सरकार स्थापन करण्याचा त्यांचा इरादा होता. पण बांग्लादेशी जनतेने त्यांना सपशेल नाकारलं आहे. कट्टरता नाही तर विकास महत्वाचा असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली होती. जवळपास 10 लाख सुरक्षारक्षकांची तैनाती करण्यात आली होती.

Follow Us
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...