परिणीती चोप्राचा ‘सायना’ चित्रपट ‘या’ तारखेला चाहत्यांच्या भेटीला!

परिणीती चोप्राचा 'सायना' चित्रपट 'या' तारखेला चाहत्यांच्या भेटीला!

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्यात दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 02, 2021 | 3:07 PM

मुंबई : बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्यात दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होते यादरम्यानची परिणीतीची काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. (Parineeti Chopra’s ‘Saina’ will be released on 26 March 2021)

आता परिणीतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर लिहिले आहे, ‘सायना’ हा चित्रपट 26 मार्च 2021 रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी केली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका हातात शटलकॉक दिसत आहे. परिणीतीच्या अगोदर या चित्रपटात श्रद्धा कपूरची भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला.

यानंतर परिणीती चोप्राला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले.परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता, या चित्रपटात परिणीती गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये परिणीती विदेशात भटकताना दिसली होती. द गर्ल ऑन द ट्रेन या चित्रपटाचा टीझर परिणीतीने सोशल मिडियावर शेअर केले होते. या चित्रपटात परिणीतीसोबतच, अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी देखील आहेत.

संबंधित बातम्या : 

जॉन अब्राहमचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

आधी अथिया आता ‘तडप’ मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार सुनील शेट्टीचा मुलगा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

Video : उस्तादाप्रमाणे तबला वाजवतेय सारा अली खान, तरीही नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

(Parineeti Chopra’s ‘Saina’ will be released on 26 March 2021)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें