AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नव्या वहिनीसाहेबांचा बिग बींच्या ‘जुम्मा-चुम्मा’वर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा’!

अभिनेत्री धनश्री काडगावकरने ही भूमिका उत्तमरीत्या निभावली होती. मात्र, तिच्या एक्झिटनंतर आलेल्या नव्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने देखील या पात्राचं शिवधनुष्य लिलया पेललं.

Video | नव्या वहिनीसाहेबांचा बिग बींच्या ‘जुम्मा-चुम्मा’वर जबरदस्त डान्स, पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा’!
माधुरी पवार
| Updated on: Mar 03, 2021 | 5:04 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ऑफ एअर गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात त्यातील पात्र नेहमीच जिवंत राहतात. अशीच एक मालिका अर्थात ‘तुझ्यात जीव रंगला’! या मालिकेतील राणादा, अंजली बाई, गोदाक्का, वहिनीसाहेब अशी सगळीच पात्र कमालीची गाजली होती. विशेषतः या मालिकेतील खलनायिक अर्थात ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकरने ही भूमिका उत्तमरीत्या निभावली होती. मात्र, तिच्या एक्झिटनंतर आलेल्या नव्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने देखील या पात्राचं शिवधनुष्य लिलया पेललं (Tujhyat Jeev Rangla Vahinisaheb Fame Actress Madhuri Pawar Dance on Jumma Chumma Song).

केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर, सोशल मीडियावर देखील माधुरीच्या नावाची मोठी चर्चा असते. तिचे अनेक डान्स व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिच्या डान्स व्हिडीओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते.

पाहा वहिनीसाहेबांचा ‘जुम्मा-चुम्मा’वर जबरदस्त डान्स!

View this post on Instagram

A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

(Tujhyat Jeev Rangla Vahinisaheb Fame Actress Madhuri Pawar Dance on Jumma Chumma Song)

सोशल मीडियावर माधुरी इतकी ॲक्टिव क्वचितच एखादी अभिनेत्री राहत असेल. तिचे अनेक डान्स व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या नृत्य शैलीमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. तिच्या मॉडर्न लूकमधील काही व्हिडीओ व फोटोंनी तर युवा पिढीला अक्षरशः भुरळ घातली आहे.

मालिकेत नेहमीच साडीवर दिसणाऱ्या माधुरीच्या या बोल्ड डान्सला पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. याच कारणाने माधुरी सध्या अनेक इव्हेंटसाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी अनेकांची पसंती ठरत आहे. माधुरीने या अगोदरही छोट्यापडद्यावर काम केलं आहे. ‘झी युवा’ वरील ‘अप्सरा आली’ या डान्स शो आपल्या नृत्याचे  जलवे दाखत ती विजेती ठरली होती (Tujhyat Jeev Rangla Vahinisaheb Fame Actress Madhuri Pawar Dance on Jumma Chumma Song).

‘वाहिनीसाहेबां’नी दिली खरी ओळख!

मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांनी मालिकेत पुन्हा एंट्री घेतल्यावर आता नव्या वहिनीसाहेब कोण असणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होतीच.

एकीकडे या मालिका शेवटच्या टप्प्यात होती. तर प्रेक्षक देखील वहिनीसाहेबांना मिस करत होते. प्रेक्षकांची हीच उत्सुकता लक्षात घेता माधुरीच्या रुपात ‘नंदिता वहिनी’ची मालिकेत पुन्हा एकदा दमदार एंट्री झाली होती. धनश्री काडगावकरने मालिकेला गुडबाय म्हटल्याने ही भूमिका माधुरीकडे आली. या पात्राचं वेगळेपण जपत माधुरी देखील प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचली.

(Tujhyat Jeev Rangla Vahinisaheb Fame Actress Madhuri Pawar Dance on Jumma Chumma Song)

हेही वाचा :

Tandav Controversy | ‘तांडव’च्या वादांचे तांडव सुरूच!  अ‍ॅमेझॉनच्या अपर्णा पुरोहितांच्या याचिकेची सुनावणी लांबणीवर!

Video : श्रद्धा कपूरचे बर्थडे सेलिब्रेशन थेट मालदीवमध्ये, पाहा खास व्हिडीओ

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.