
Palash Muchhal and Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधना आणि म्यूजिक कंपोजर पलाश मुच्छल यांच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न रद्द झाल्याची घोषणा केली. पण लग्न का रद्द झालं? याबद्दल काहीही सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्यान नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या, तर अनेकांनी त्यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य देखील केलं. आता अभिनेत्री डेझी शाह हिला पलाश आणि स्मृती यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. सांगायचं झालं तर, पलाश याच्या आगामी सिनेमात डेझी झळकरणार आहे. तर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत डेझी शाह हिने दोघांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
डेझी शाह म्हणाली, ‘पलाश आणि स्मृती एक चांगलं कपल होतं. त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे. सत्य नेमकं काय आहे, हे बाहेरच्या लोकांना माहिती नसतं. त्या नात्यामध्ये नक्की काय आणि कसं झालं हे फक्त त्या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती असेल… त्यामुळे बाहेरच्या लोकांनी यावर काही बोलू नये… असं मला वाटतं.’ असं देखील डेझी म्हणाली.
डेझीने असं देखील सांगितलं की, पलाश याला अभिनेत्रीला सिनेमात कास्ट करायचं होतं. पण त्याने कधीच डेझी हिला सिनेमासाठी फोन केला नाही. त्याने कायम दुसऱ्या लोकांच्या माध्यमातून डेझी हिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वतः डेझीने पलाश याला फोन करुन विचारलं. यावर पलाश म्हणालेला, ‘सध्या जी काही परिस्थिती आहे, त्यामुळे मी कोणाशी थेट संपर्क साधत नाहीये..’ असा खुलासा देखील अभिनेत्रीने केला.
सांगायचं झालं तर, पलाश आणि स्मृती यांचं लग्न आधीपासूनच चर्चेत होतं. लग्नापूर्वीच्या विधींचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. पण लग्नाच्या दोन तास पूर्वी असं काही झालं, ज्यामुळे लग्न कायमचं रद्द झालं. अशात सोशल मीडियावर नकोत्या चर्चांना उधाण आलं… पण यावर स्मृती आणि पलाश यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता, लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली.