Salman Khan : जो न मिले वो याद आए.. सलमान खानची क्रिप्टीक पोस्ट, चाहते हैराण
अंबानींच्या अँटिलियातील गणेशोत्सवात सलमान खानने हजेरी लावली. बाप्पाचं दर्शन घेतानाचे त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले. मात्र, या सेलिब्रेशननंतर सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या गूढ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. 'कमी मिळाल्यावर आनंद, जास्त मिळाल्यावर दुःख का?' या त्याच्या विचारावर चाहते नवीन प्रोजेक्ट किंवा मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवत आहेत.

गणेशोत्सव नुकताच सुरू झाला असून सध्या सगळीकडे आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. गणरायाचा जयघोष, आरत्या सर्वत्र ऐकायला येत आहे. दरम्यान अंबानी कुटुंबाच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त खास सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. दबंग स्टार, अर्थात अभिनेता सलमान खानही (Salman Khan) गणरायाच्या दर्शनासाठी आला होता. या सेलिब्रेशनमधील सलमानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये सलमान बाप्पासमोर हात जोडून पूजा करताना आणि फुलं अर्पण करताना दिसला. या खास प्रसंगी सलमान खान नव्या लूकमध्ये अँटिलियामध्ये दाखल झाला. त्याच्या डोक्यावर स्कार्फ बांधलेला पाहायला मिळाला. मात्र बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता सलमानने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सलमानची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
गणेश चतुर्थीच्या सेलिब्रेशननंतर सलमान खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण सुरुवातीला किती उत्सुक असतो, मात्र तीच गोष्ट भरपूर प्रमाणात मिळाल्यानंतर तिचं महत्त्व कमी का होतं, असा विचार या पोस्टमधून मांडण्यात आला आहे. या ऑडिओ म्युझिक व्हिडिओची सुरुवात एका विचार करायला लावणाऱ्या ओळीने होते—‘जेव्हा थोडं मिळतं तेव्हा असतो होतो, आता जास्त मिळालं तर दुःखी का?’ असं त्यात लिहीलं. मात्र सलमानने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडिया यूजर्समध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
चाहते झाले हैराण
मात्र सलमानच्या या गूढ पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भाई, काय झालं?’ असं काही चाहत्यांनी थेट विचारलं. तर काही जणांनी या पोस्टमागे काही मोठं कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला. सलमानकडून लवकरच एखादं मोठं लॉन्च किंवा प्रोजेक्ट जाहीर होऊ शकतं, असं काही युजर्स म्हणाले, तर काहींनी ही पोस्ट एखाद्या नव्या गायकाच्या लॉन्चशी संबंधित असल्याची शक्यताही व्यक्त केली
अंबानीच्या घरी सलमानने घेतलं गणरायाचं दर्शन
दरम्यान, अंबानींच्या घरी झालेल्या गणपती उत्सवातील सलमान खानचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. बाप्पासमोर हात जोडून पूजा करताना दिसलेल्या सलमानचं अनेकांनी कौतुक केलं. मात्र, काही सोशल मीडिया यूजर्सनी त्याच्या पूजा करण्याच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. ‘देवाला अशा प्रकारे फुलं अर्पण करत नाहीत.’ असं म्हणत काहींनी थोडी टीकाही केली.