AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: विषय फक्त मंदिराचा आहे, सलमान खानने तिथं जावं अन्… बॉलिवूडमध्ये अनेकांचे प्राण वाचतील

Salman Khan Lawrence Bishnoi Gang Dispute: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर काल जुहू येथे हल्ला झाला. या नंतर सलमान खानबाबत एक गोष्ट समोर आली. जर सलमान खानने एक गोष्ट केली तर नक्कीच अनेक बॉलिवूडमधील लोकांचे प्राण वाचतील.

Salman Khan: विषय फक्त मंदिराचा आहे, सलमान खानने तिथं जावं अन्... बॉलिवूडमध्ये अनेकांचे प्राण वाचतील
| Updated on: Oct 19, 2026 | 10:30 AM
Share

Tiger Shroff Firing: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर, सुपरस्टार सलमान खान आणि गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीमधील वैर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सलमान आणि लॉरेन्स यांच्यातील हा तणाव गेल्या आठ वर्षांपासून सुरू आहे. ही टोळी सलमानच्या जवळच्या व्यक्तींना सतत टारगेट करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. या टोळीच्या मते सलमान खानने जर एक गोष्ट केली तर बॉलिवूडमधील अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात.

ही टोळी केवळ सलमान खानलाच नव्हे, तर त्याच्या जवळच्या व्यक्तींना सतत टारगेट करत असते. गेल्या काही वर्षांपासून, लॉरेन्स टोळीने सलमान तसेच त्याचे जवळचे सहकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील हे वैर १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणातून सुरू झाले. राजस्थानमध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटाची शिकार केल्याचा आरोप या बॉलिवूड सुपरस्टारवर होता.

बिश्नोई समाज काळवीटाची देवता म्हणून पूजा करतो. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच समाजाचा आहे. लॉरेन्सचा दावा आहे की सलमान खानने बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. लॉरेन्सने वारंवार सांगितले आहे की, जोपर्यंत सलमान खान बिकानेरमधील त्यांच्या मंदिरात जाऊन माफी मागत नाही, तोपर्यंत त्याची टोळी त्याचा पाठलाग सोडणार नाही.” यावरुन असे समजते की सलमान खानने जर या मंदिरात जाऊन माफी मागितली, तर खरोखरच बॉलिवूडमधील आणि सलमानच्या जवळच्या व्यक्तींचे प्राण वाचू शकतात.

काल जुहू परिसरात टायगर श्रॉफवर हल्ला करण्यात आला. फुटबॉल खेळून टायगर घरी निघत असताना त्याच्या कारवर अचानक हल्ला झाला. या गोळीबारात टायगर थोडक्यात बचावला पण ड्रायव्हर जखमी झाला. रिक्षा चालकही या हल्ल्यात जखमी झाला. टायगरवर झालेल्या हल्ल्यामुळे आता पुन्हा एकदा कायदा सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईसारख्या शहरात असं सर्रास हल्ला होणं हे आता खरोखरच चिंतेची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया आता लोकांकडून येत आहे.

Follow Us
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ...
गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीचा आज फैसला! सतेज पाटील की हसन मुश्रीफ, कोण मारणार बाजी?
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी
टायगर श्रॉफच्या भेटीसाठी वेळ, पण प्रदीप पूर्णेकरांच्या घरी जाण्यासाठी नाही? राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर...
दुष्काळात मेंढपाळांनाही मदत द्या; पडळकरांची मागणी, धनगर आरक्षणावर मोठं विधान!
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय...
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या दुसऱ्याच दिवशी सरकारचा सर्वात मोठा निर्णय, जुहू परिसरातील सर्व...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट;
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेत्याची भेट; म्हणाले, गुन्हेगारांना...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?