अभिनेत्रीच्या नाभीवर पाणी ओतलं आणि…, सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा

Bollywood Actress: अभिनेत्री मिळते नको तशी वागणूक..., अभिनेत्रींच्या नाभीवर पाणी ओतलं आणि..., सलमान खानच्या अभिनेत्रीला आलेला धक्कादायक अनुभव... जाणून व्हाल थक्क... अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

अभिनेत्रीच्या नाभीवर पाणी ओतलं आणि..., सलमान खानच्या या अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Aug 25, 2025 | 10:27 AM

Bollywood Actress: इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. आता अभिनेता सलमान खान स्टारर ‘जय हो’ सिनेमातील अभिनेत्री डेझी शाह हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण आता डेझी कोणत्या सिनेमामुळे नाही तर, तिने केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आता कन्नड सिनेविश्वातील मोठं सत्य अभिनेत्रीने समोर आणलं आहे. कन्नड सिनेविश्वात अभिनेत्रींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल डेझी हिने महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत डेझी शाह हिने कन्नड सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘जेव्हा शुटिंग करत होती, शुटिंगनंतर रिकाम्या वेळेत मी कन्नड गाणी ऐकत होती… तिथे एक अभिनेता आहे आणि त्याने सर्व गाण्यांमध्ये अभिनेत्रीच्या नाभीवर कोशिंबीर नाही तर, भाज्यांची कोशिंबीर बनवताना क्लॉज-अप शॉट शूट केले… नाही तर कधी बर्फाचं पाणी अभिनेत्रींच्या नाभीवर टाकलं आहे…’ असं डेझी शाह म्हणाली.

 

 

कोणत्या अभिनेत्याची डेझीने केली पोलखोल?

आलेला अनुभव सांगत डेझी हिने कोणत्या अभिनेत्याचं नाव घेतलं नाही. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया एक्सवर नेटकऱ्यांनी अभिनेत्याचं नाव घेतलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आणि दिग्दर्शक रवीचंद्रन आहे… जो त्याच्या सिनेमांमध्ये कायम असं करत असतो… असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे…

सध्या डेझी शाह हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे… एक नेटकरी म्हणाला, ‘रवीचंद्रन… आमचे स्वतःचे चीफ नेव्हल ऑफिसर…’, सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मालविका मोहनन हिने देखील दाक्षिणात्य सिनेमाबद्दल मोठा खुलासा केला होता.

मावविका मोहनन म्हणाली, ‘मी आधी खूप आश्चर्यचकित व्हायचे, कारण मी मुंबईत वाढलेली आहे. याठिकाणी नाभीबद्दल इतकं वेड आहे ही माझ्यासाठी पूर्णपणे नवीन गोष्ट होती…. सांगायचं झालं तर, झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्यासोबत घडणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.