AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhe Trailer Out |  मनोरंजन आणि अॅक्शनची मेजवानी, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ!

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या बहुप्रतिक्षित ‘राधे’ (Radhe) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे.

Radhe Trailer Out |  मनोरंजन आणि अॅक्शनची मेजवानी, सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ!
राधे ट्रेलर
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Apr 22, 2021 | 12:00 PM
Share

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या बहुप्रतिक्षित ‘राधे’ (Radhe) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे आणि आता त्याच्या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये सलमान जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसला आहे. सलमान आणि रणदीपची ही जोडी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करणार आहे (Salman Khan flim Radhe your most wanted bhai movie trailer release).

2 मिनिट 51 सेकंदाचा हा ट्रेलर मुंबई शहरातून सुरू होत आहे, जिथे ड्रग्ज आणि गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. त्यानंतर शहरात गुन्हेगारी वाढवणार्‍या रणदीप हूडाची एन्ट्री होते. ‘राधे’ म्हणजे सलमान खानला या गुन्ह्याला आळा आणि वेसण घालण्यासाठी बोलावण्यात आले आहे. सलमान आणि रणदीप यांच्यातील लढा या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट भाग ठरणार आहे.

पाहा ‘राधे’चा जबरदस्त ट्रेलर

प्रत्येक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी टीझर रिलीज केला जातो. परंतु, राधेचा हा टीझर प्रदर्शित झालेला नाही. जेव्हा चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला तेव्हा, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच टीझर न रिलीज करता थेट ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळेल असा निर्मात्यांचा विश्वास होता.

चित्रपटामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. थिएटर व्यतिरिक्त प्रेक्षक ‘झी 5’वर ‘पे पर व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील आणि प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जातील (Salman Khan flim Radhe your most wanted bhai movie trailer release).

थिएटर मालकांना केले अपील

जेव्हा सलमानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली तेव्हा त्याने चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले होते की, त्याचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागेल.

जॉन अब्राहमशी टक्कर!

याक्षणी, सलमान खानचा ‘राधे’ बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’शी स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे. ‘राधे’ हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होत आहे आणि ‘सत्यमेव जयते 2’ देखील त्याच दिवशी रिलीज होईल. यापूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. पडद्यावर कोणता चित्रपट रसिकांचे मन जिंकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तथापि, सलमान खानच्या ‘राधे’ समोर ‘सत्यमेव जयते 2’ च्या निर्मात्यांवर अपेक्षांचे ओझे वाढू शकते. त्याचबरोबर जॉनच्या चित्रपटामुळे सलमानच्या ‘राधे’वरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

(Salman Khan flim Radhe your most wanted bhai movie trailer release)

हेही वाचा :

Video | टायटॅनिक पोझ देताना वाऱ्याने केला घोटाळा, ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार!

‘भाईजान’ पुन्हा एकदा कोरोना वॉरिअर्सच्या मदतीला धावला, ‘फ्रंटलाइन वर्कर्स’साठी पाठवले फूड किट्स!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली