Sonali Bendre : कॅन्सरवर सुरु असलेले उपचार, सोनालीसाठी सलमान खानने असं काही केलं, ज्यामुळे…

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता सिनेमांमुळे चर्चेत नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. नुकता झालेल्या एका मुलाखतीत सोनाली हिने कठीण काळात अभिनेता सलमान खान याने केलेल्या मदतीबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त फक्त सोनाली हिची चर्चा रंगली आहे.

Sonali Bendre : कॅन्सरवर सुरु असलेले उपचार, सोनालीसाठी सलमान खानने असं काही केलं, ज्यामुळे...
Sonali Bendre - Salman Khan
| Updated on: Oct 18, 2026 | 1:47 PM

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सोनाली चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली हिने अभिनेता सलमान खान याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सोनाली, सलमान खान याला खोडकर म्हणाली, पण कठीण काळात सलमान खान याने सोनालीची मदत केली.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, सलमान खान खूप खोडकर आहे आणि मला शिस्त आवडते… क्लोजअप सुरु आहे आणि दुसरीकडे तो असे वेडेवाकडे तोंड करणार.. मग माझं असं व्हायचं, की काम करत आहे, तू असं करु नकोस, त्यावेळी असं वाटायचं, कोण आहे हा? आणि असं का करतोय. पण त्याच्यासोबत काम करताना, जसे दिवस गेले, तेव्हा कळलं की, तो खोडकर आहे. पण त्याचं मन फार मोठं आहे.

Loading...

सलमान खान याच्याबद्दल काय म्हणाली सोनाली?  

सोनाली म्हणाली, मी  जेव्हा आजारी होते, तेव्हा सर्वात पहिला कॉल सलमान खानचा आलेला आणि तो मला भेटण्यासाठी युरोपला आलेला. तो (सलमान खान) गोल्डीला फोन करायचा विचारायचा, खरंच डॉक्टर चांगले आहेत का? त्याने स्वतः रिसर्च केलं. सलमान याने डॉक्टरांबद्दल गोल्डीला सांगितलं. सलमानने त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांना गोल्डीसोबत बोलायला लावलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, त्यांचे उपचार चांगल्या डॉक्टरांच्या देरेखीखाली सुरु आहेत. जे करत आहेत, त बरोबर आहे. असं देखील सोनाली बेंद्रे म्हणाली.

‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये काय म्हणाली सोनाली? 

‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये देखील सोनाली हिने कॅन्सरबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. माधुरी दीक्षितने विचारलं, ‘तू कॅन्सरवर मात केलीस?’ यावर सोनाली म्हणाली, ‘आपण मात करतो असं म्हणतो ना, तेव्हा मला भांडल्यासारखं वाटतं, एक नकारात्मकता मला जाणवते. शेवटी ते आपलंच शरीर आहे. ज्या कॅन्सर सेल्स आहेत, त्या आपल्याच सेल्स आहे, अशात आपल्याच सेल्ससोबत आपण काय भांडणार…’, असं देखील सोनाली बेंद्रे म्हणालेली.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us