AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सर ग्रस्त चिमुकल्यासाठी सलमान खान याने घेतला मोठा निर्णय; भाईजानने मुलाची इच्छा तर पूर्ण केलीच, पण…

Salman Khan : प्रसंग भावुक करणारा... कॅन्सर ग्रस्त चिमुकल्यासाठी सलमान खान याने घेतला पुढाकार... ट्यूमरमुळे दृष्टी गेलेल्या चिमुकल्याची भाईजानने इच्छा तर पूर्ण केलीच, पण..., परिस्थिती जाणून व्हाल थक्क

कॅन्सर ग्रस्त चिमुकल्यासाठी सलमान खान याने घेतला मोठा निर्णय; भाईजानने मुलाची इच्छा तर पूर्ण केलीच, पण...
| Updated on: Jan 26, 2024 | 9:35 AM
Share

मुंबई | 26 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमान खान त्याच्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असतो. पण भाईजान संकटाच्या वेळी अनेकांच्या मदतीला धावत जातो. आता देखील एका कॅन्सरग्रस्त चिमुकल्याच्या भेटीला सलमान खान पोहोचला. एवढंच नाही तर, सलमान खान याने चिमुकल्याला दिलेलं वचन देखील पूर्ण केलं. सलमान खान याने भेट घेतलेल्या कॅन्सरग्रस्त चिमुकल्याचं नाव जगनबीर असं आहे.

सलमान खान याने जगनबीर आणि त्याच्या कुटुंबियांसोबच गप्पा मारल्या. सलमान आणि जगनबीर यांनी जवळपास 30 मिनिटं गप्पा मारल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जगनबीर वयाच्या चौथ्या वर्षापासून ट्यूमर या गंभीर आजाराचा सामना करत आहे.

2014 मध्ये जगनबीर याला भेटण्यासाठी सलमान मुंबई येथील टाटा मेमेरियल रुग्णालयात पोहोचला होता. तेव्हा सलमान पहिल्यांदा जगनबीर याला भेटला. ट्यूमरमुळे जगनबीर याची दृष्टी देखील गेली होती. जगनबीर सुरुवातीपासून सलमान खान याचा चाहता आहे. जगनबीर याने रुग्णालयातून एक व्हिडीओ तयार केला होता आणि सलमान खान याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जगनबीर यांच्यावर किमोथेरपी सुरु होती. तेव्हा सलमान खान पहिल्यांदा जगनबीर याला भेटला होता. तेव्हा जगनबीर याची प्रकृती फार गंभीर होती. सलमान खान आपल्याला भेटण्यासाठी आला आहे… यावर जगनबीर याला विश्वासच बसत नव्हता…

2018 मध्ये सलमान खान याने जगनबीर याला एक वचन दिलं होतं. तू एका शूरवीराप्रमाणे तुझ्या आजारावर मात करत… मी पुन्हा तुला भेटण्यासाठी येईल… असं वचन सलमान याने जगनबीर याला दिलं होतं. अखेर सलमान खान याने 2024 मध्ये जगनबीर याला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे.

सलमान खान याच्या टीमने जगनबीर याच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधला आणि त्यांना भाईजानच्या घरी भेटण्यासाठी बोलावलं… आनंदाची गोष्ट म्हणजे जगनबीर याची प्रकृती स्थिर आहे. उपचारानंतर जगनबीर याची दृष्टी देखील परत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि जगनबीर यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला