AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते रात्री यायचे आणि सकाळी जायचे…’, ऐश्वर्याला भेटायला यायचा सलमान, दिग्गज अभिनेत्रीने सांगितलं सत्य

अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी नुकतेच सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘सलमान दररोज रात्री तिला भेटण्यासाठी यायचा.’

‘ते रात्री यायचे आणि सकाळी जायचे...’, ऐश्वर्याला भेटायला यायचा सलमान, दिग्गज अभिनेत्रीने सांगितलं सत्य
Salman KhanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 19, 2025 | 6:10 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी आतापर्यंत सर्वात जास्त लोकप्रिय ठरली आहे. दोघांनीही एकमेकांना अगदी थोड्या वेळासाठी डेट केले असले तरीही त्यांच्या नात्याची आणि नंतर ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगली होती. पण सलमानच्या आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांना या प्रेमकहाणीमधील प्रत्येक छोटीशी गोष्ट जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. नुकतेच या दोन्ही स्टार्ससोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिग्गज अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की ‘ते रात्री यायचे आणि सकाळी जायचे…’

हिमानी शिवपुरी यांनी सलमान आणि ऐश्वर्याबद्दल सांगितले

हिमानी शिवपुरी नुकताच रेड एफएमच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने आपल्या अनेक चित्रपटांचे किस्से शेअर केले. याच दरम्यान त्यांनी ऐश्वर्या रायबद्दलही वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाल्या की, मी ऐश्वर्याला पहिल्यांदा ‘आ अब लौट चलें’ च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर आम्ही ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ मध्ये एकत्र काम केले.

वाचा: हे काय स्वप्न नाही बरं का; गुलिगत सूरज चव्हाणचं ठरलं लग्न, तिच्यासोबतचा खास फोटो

सेटवर ऐश्वर्याला भेटायला यायचे सलमान

हिमानी पुढे म्हणाल्या की, ‘एकदा मी ऐश्वर्यासोबत हैदराबादमध्ये शूटिंग करत होते. तेव्हा सलमान अनेकदा सेटवर यायचे. त्या वेळी ऐश्वर्या आणि सलमान खूप चांगले मित्र होते, म्हणून सलमान दररोज रात्री यायचे आणि सकाळी निघून जायचे. तसेच जेव्हा एकदा ऐश्वर्या अभिनेता अभिषेक बच्चनसोबत शूटिंग करत होती, तेव्हाही सलमान खान माझ्याकडे आले होते.’

‘स्वतःला खूप सुंदर समजते’

अभिनेत्रीने सांगितले की, सलमान येऊन मला म्हणायचे की, ‘काय आहे हे? याला समजाव जरा. वहिदा रहमानला बघ… त्या स्वतःला खूप सुंदर समजतात…’ मी त्यांना म्हणायचे, शांत व्हा, थोडे गप्प बसा…’ त्यानंतर हिमानी यांनी दोघांच्या ब्रेकअपबाबत म्हटले की, ‘याबाबत मला देखील काही माहिती नाही, कदाचित त्यांच्यात काही गोष्टी जुळल्या नसाव्यात.’

Follow Us
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...