Salman Khan : भरगर्दीतून वाट काढत निघाली सलमानची कार, ड्रायव्हरची ती चूक होताच भाईजानचा चढला पारा; थेट..
अभिनेता सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्यामध्ये तो त्याच्या ड्रायव्हरवर प्रचंड भडकल्याचं दिसून आलं. असं नेमकं काय घडलं ?

मुंबईसह राज्यभरात आणि देशातही गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सामान्य जनतेप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींच्याही घरी गणपतीचे आगमन होतं. मुंबईतील विविध ठिकाणच्या प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी देखील सेलिब्रिटी पोहोतचात. अभिनेता सलमान खान (Salman Khan) देखील असाच गणपती दर्शनासाठी एके ठिकाणी पोहोचला होता. याचदरम्यान सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तो ड्रायव्हरवर भडकलेला दिसला. हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. सलमान गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राजकारणी आशीष शेलार यांच्या घरी पोहोचला होता. ही बातमी लोकांना समजताच आशीष शेलार यांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमा झाली. सलमान बाहेर येताच ही गर्दी बेकाबू झाली.
नेमकं काय घडलं ?
लोक सलमानच्या कारच्या अगदी जवळ पोहोचले आणि काही चाहते तर गाडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे सलमानच्या ड्रायव्हरला समोरचा रस्ता पाहणेही कठीण झाले. त्याने गाडी पुढे नेली आणि कारचे चाक एका चाहत्याच्या पायावरून गेले. सलमानने हे पाहताच तो संतापला. त्याने ड्रायव्हरच्या हातावर मारले आणि त्याला रागाने गाडी तातडीने मागे घेण्यास सांगितलं.
आधी केलं ट्रोल पण सत्य समोर येताच…
या घटनेचा छोटासा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सलमान आपल्या ड्रायव्हरसोबत गैरवर्तन करत असल्याचे लोकांना वाटलं. मात्र, नंतर संपूर्ण व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना संपूर्ण प्रकरण समजलं. आता सोशल मीडिया यूजर्सनी सलमानचे कौतुक केलं आहे. सलमान नेहमीच आपल्या चाहत्यांची काळजी घेतो, असं अनेकांनी म्हटलं.
सलमान खानचे आगामी चित्रपट
मातृभूमी: अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा ॲ, क्शन ड्रामा चित्रपट 2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाचे शूटिंग आणि निर्मिती पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळालेले नाही.
मॉन्स्टर: दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक वामशी पैदिपल्ली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात सलमान खान दमदार भूमिकेत दिसणार आहे.
टायगर वर्सेस पठाण: सलमान खानच्या ‘टायगर’ आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’ यांच्यातील जबरदस्त टक्कर पाहायला मिळणारा हा चित्रपटही जाहीर करण्यात आला .