Bigg Boss 20 : सलमानच्या शोमधून पहिलं मिड-वीक एव्हिक्शन, कोण पडलं बाहेर ? नाव वाचून बसेल झटका
'बिग बॉस 20' सुरू होऊन जवळपास महीना होत आला आहे. आता हा शो नव्या वळणावर आलाय. घरातील 2 स्पर्धक बाहेर झाले असून 11 स्पर्धक हे बेघर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत.

Bigg Boss 20 : सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेला बहुचर्चित ‘बिग बॉस 20’ या रिॲलिटी शोच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. शो जसजसा पुढे जातोय, प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडतोय. घरातल्या स्पर्धकांनीही त्यांचा खरा गेम सुरू केलाय. आत्तापर्यंत या शोमधून 2 स्पर्धक आऊट झाले आहेत. याचदरम्यान आता ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. एका रात्रीत घरातील एका स्पर्धकाचा पत्ता कट झाला आहे. हो , हे खरं आहे, या शोमध्ये आठवड्याच्या मध्यातच ( मिड-वीक) एव्हिक्शन झाला आहे. बाहेर पडण्याची वेळ कोणावर आली आणि हा महाट्विस्ट कसा आला, ते जाणून घेऊया.
या स्पर्धकाला पडावं लागलं बाहेर
टीव्हीवरचा सर्वात चर्चित पण तेवढाच वादग्रस्त शो असलेला ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन जवळपास 4 आठवडे झालेत. आता या शोमध्ये नवं वळण आलंय. घरातील 2 स्पर्धक बाहेर पडले असून आता 11 स्पर्धक हे बेघर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत. ‘बिग बॉस तक’ च्या रिपोर्टनुसार, घरातील जी व्यक्ती बाहेर पडली आहे, ती दुसरी-तिसरी कोणी नाही, त्या स्पर्धकाचं नाव आहे रिती तिवारी. ती आठवड्याच्या मध्यातच शोमधून बाहेर पडलीये.
कसं झालं मिड -वीक एव्हिक्शन ?
रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसने उदिति, माही विज आणि यंग DSA यांना सीक्रेट रूममध्ये बोलावनलं. त्यांना एक महत्वचा निर्णय घ्यायचा आहे, असं बिग बॉसने त्यांना सांगितलं. त्यांच्या या निर्णयामुळे घरातील एका सदस्याचा शोमधील प्रवास संपुष्टात येऊ शकतो, याची कल्पना त्यांना देण्यात आली. कोणाची एक लाइफलाइन काढून घ्यायची, हे त्यांना परस्पर सहमतीने ठरवायचं होतं. तिघांनी चर्चा करून अखेर रिती तिवारीटचं नाव घेतलं. रीति हिची एक लाइफलाइन आधीच संपली होती. त्यामुळे दुसरी लाइफलाइन गेल्यावर ती शोमधून बाहेर पडली. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
वादांमुळे रीतिवर भडकला होता सलमान खान
दरम्यान, ‘बिग बॉस 20’च्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान रीति तिवारी हिच्यावर चांगलाच संतापला होता. “हा आतापर्यंतचा सर्वात वाईट Diss होता.” असं त्याने सांगितलं. प्रथम सलमानने रीतिला विचारलं की, ती काझीचा फक्त हेवा करत नाही, तर ती त्याच्याबाबत खूप इनसिक्युअरही आहेत.
यावर रीतिने उत्तर दिलं की, “मला अजिबात हेवा वाटत नाही. मला तो व्यक्ती म्हणून आवडत नाही.” त्यानंतर सलमान म्हणाला, “ तू जे केलं ते योग्य होतं.” यावर रीतिने सांगितलं, मी जे काही म्हटलं, त्यामागचा हेतू किंवा अर्थ चुकीचा नव्हता. मात्र, भाईजानने तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. तू अपमान करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असंही सलमानने तिला सुनावलं.
बिग बॉस मीटरसाठी 5 जणांमध्ये टक्कर
गेल्या आठवड्यात बिग बॉसचा ‘बॉस मीटर’ किताब अरिश्फा खानने जिंकला होता. आता या किताबासाठी पाच स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. बॉस मीटरच्या शर्यतीत पहिले नाव घरचा कॅप्टन कुशल तंवर उर्फ गुल्लू याचं आहे. त्यानंतर माही विज, आम्रपाली दुबे, अमन गांधी आणि रीति तिवारी यांची नावं या रेसमध्ये आहेत. आता या आठवड्यात ‘बॉस मीटर’चा मुकूट कोणाच्या डोक्यावर दिसणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.