Johnny Depp: जॉनी डेपनं भारतीय रेस्टॉरंटमध्ये असं काय खाल्लं असेल, ज्याचं बिल 48 लाख रुपये आलं?

जॉनीने नुकताच त्याच्या पूर्व पत्नीविरोधातला मानहानीचा खटला जिंकला. अँबर हर्डने जॉनीला 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 116 कोटी रुपये द्यावे, असा आदेश कोर्टाने दिला. या मोठ्या विजयानंतर त्याने ही जंगी पार्टी केल्याचं समजतंय.

Johnny Depp: जॉनी डेपनं भारतीय रेस्टॉरंटमध्ये असं काय खाल्लं असेल, ज्याचं बिल 48 लाख रुपये आलं?
Johnny Depp
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 9:58 AM

प्रसिद्ध हॉलिवूड स्टार जॉनी डेप (Johnny Depp) याने रविवारी युकेमधील बर्मिंगहम इथल्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये (indian restaurant) त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत पार्टी केली. या पार्टीचं बिल त्याने जवळपास 48 लाख रुपये भरल्याची माहिती समोर येत आहे. शॅम्पेन आणि कॉकटेल्ससोबत त्याने चिकन टिक्का मसाला, किंग प्रॉन्स भुना अशा पदार्थांचा आस्वाद घेतला. खास मित्र आणि म्युझिशियन जेफ बेक (Jeff Beck) आणि इतर 20 मित्रमैत्रिणींसोबत जॉनीने ही पार्टी केली. त्याने युकेमधील वाराणसी रेस्टॉरंटमधील संपूर्ण जागा त्या वेळेसाठी बुक केली होती. जॉनीने नुकताच त्याच्या पूर्व पत्नीविरोधातला मानहानीचा खटला जिंकला. अँबर हर्डने जॉनीला 15 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 116 कोटी रुपये द्यावे, असा आदेश कोर्टाने दिला. या मोठ्या विजयानंतर त्याने ही जंगी पार्टी केल्याचं समजतंय.

भारतीय रेस्टॉरंटमध्ये जॉनी डेपने काय खाल्लं?

जवळपास 20 हजार स्क्वेअर फूटमध्ये असलेल्या वाराणसी रेस्टॉरंटमध्ये जॉनी आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी शिश कबाब, चिकन टिक्का, किंग प्रॉन्स भुना, व्हेजिटेबल समोसा, लँब करी, चिकन टिक्का मसाला, रासबेरी चिजकेक, पन्ना कोटा यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला. एकूण 22 जण या पार्टीला उपस्थित होते, अशी माहिती रेस्टॉरंटचे मालक मोहम्मद हुसैन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली. शॅम्पेन, कॉकटेल, रेड वाईन असे ड्रिंक्ससुद्धा यावेळी सर्व्ह करण्यात आले होते. रेस्टॉरंटमध्ये यावेळी बॉलिवूड गाणी लावण्यात आली होती. तर जॉनीने वेटर्सना टिप म्हणून मोठी रक्कम दिल्याचं हुसैन यांनी सांगितलं.

पहा फोटो-

वाराणसी रेस्टॉरंटकडून इन्स्टाग्रामवर याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. यावेळी जॉनीने रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांसोबतही फोटो काढले. तिथल्या लहान मुलांसाठी त्याने त्याच्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगही बोलून दाखवले. ‘सध्या या जगात सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकाराने आमच्या रेस्टॉरंटला नुकतीच भेट दिली. जॉनी डेप हा अत्यंत विनम्र कलाकार आहे’, असं कॅप्शन या फोटोंना देण्यात आलं.