AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sania Mirza: घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने सोडलं घर, मुलासाठी घेतला मोठा निर्णय

Sania Mirza: माजी टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर दुबई येथील घर देखील सोडलं आहे. सानिया हिने मुलासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Sania Mirza: घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने सोडलं घर, मुलासाठी घेतला मोठा निर्णय
| Updated on: Mar 18, 2026 | 12:16 PM
Share

Sania Mirza: माजी टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर सानिया एकटीच मुलाचा सांभाळ करत आहे. तर पूर्व पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. घटस्फोटानंतर सानिया मुलासोबत दुबई येथील घरात राहत होती. पण आता सानिया हिने दुबईतील घर देखील सोडलं आहे. मुलासाठी सानिया हिने मोठा निर्णय घेतला आहे. यामागचं मोठं कारण देखील समोर आलं आहे. Israel-USA आणि इराण या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सानिया पुन्हा भारतात परतली आहे.

युद्ध परिस्थिती दरम्यान मायदेशी परतल्यानंतर सानिया हिने तेथील परिस्थिती सांगितली आहे… गेले काही दिवस सानिया आणि तिच्या मुलासाठी प्रचंड खडतर होते. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य-पूर्वेत पसरलेल्या भीतीबद्दल सानिया मिर्झा देखील चिंतीत दिसली. सानिया म्हणाली, दुबई त्यांच्यासाठी दुसऱ्या घरासारखं आहे, पण तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर सानिया हिने मुलासोबत ईदसाठी भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

सानिया मिर्झा मुलासोबत हैदराबाद येथे पोहोचली आहे… गेल्या आठवड्यातच ती भारतात आली. सानिया मिर्झा हिने सांगितल्यानुसार, दुबईतील तिच्या घरावरून फायटर जेट उडत असल्याचा आवाज तिने ऐकला. त्यानंतर घडलेल्या घटनांच्या मालिकेनंतर, तिने आपल्या मुलासह भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

मायदेशी परतल्यानंतर सानिया म्हणाली, तिला दुबईमध्ये असुरक्षित वाटले नाही, पण न थांबणाऱ्या लढाईमुळे तिच्याभोवती अनिश्चिततेचं सावट पसरलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिची चर्चा रंगली आहे.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाला आता जवळपास एक वर्ष झालं आहे. दोघे देखील त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सानिया मिर्झाने एप्रिल 2010 मध्ये शोएब मलिकशी लग्न केलं. त्यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा जन्म 2018 मध्ये झाला. जानेवारी 2024 मध्ये, सानियाने शोएब मलिकपासून विभक्त झाल्याची अधिकृत घोषणा केली… आज सानिया मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल