AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणी मुखर्जीसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये दिसली संजय दत्तची एक्स पत्नी; होतेय चर्चा, पाहा आता कशी दिसते?

नवरात्रीतील दुर्गा पूजा पंडालमध्ये राणी मुखर्जीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती संजय दत्तची एक्स पत्नी रिया पिल्लईसोबत दिसत आहे. या दोघींचे तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून रियाच्या सौंदर्याचे नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. लाल साडीतील तिचा साधेपणा आणि आकर्षक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

राणी मुखर्जीसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये दिसली संजय दत्तची एक्स पत्नी; होतेय चर्चा, पाहा आता कशी दिसते?
राणी मुखर्जीसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये दिसली संजय दत्तची एक्स पत्नी; होतेय चर्चा, पाहा आता कशी दिसते?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2025 | 7:03 PM
Share

नवरात्रीमध्ये दुर्गा पूजा पंडालमध्ये मुखर्जी कुटुंबाचीच चर्चा होती. अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जीसह मुखर्जी परिवारातील सर्वचजण चर्चेचा विषय ठरले. तसेच दुर्गा पूजा पंडालमध्ये प्रियांका चोप्रा , ट्विंकल खन्ना, आलिया भट यांसाखे सेलिब्रिटी देखील आले होते. पण यातील एका चेहऱ्याची जास्त चर्चा होताना दिसत आहे ती म्हणजे दुर्गा पूजा पंडालमध्ये आलेली संजय दत्तची एक्स पत्नी.

दुर्गा पूजा पंडालमध्ये संजय दत्तची एक्स पत्नीची झलक 

राणी मुखर्जीसोबत तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. संजय दत्तची एक्स पत्नी रिया पिल्लईसोबत राणी मुखर्जीचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात , चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर सर्वजन रिया पिल्लईच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

राणी मुखर्जीसोबत रिया पिल्लईचा व्हिडीओ व्हायरल 

व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी आकाशी निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे, तर रिया पिल्लई लाल साडीत साध्या लूकमध्येही सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. सोशल मीडियावरील चाहते त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “ती इतकी सुंदर दिसते की तिच्यासमोर राणीही सामान्य दिसतेय.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ती खूप सुंदर दिसते.” नेटकऱ्यांनी रियाच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केलं आहे.

रिया पिल्लई ही संजय दत्तची दुसरी पत्नी होती 

रिया पिल्लई ही संजय दत्तची दुसरी पत्नी होती. तिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर संजय दत्तने मान्यताशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्रिशला दत्त ही मुलगी आहे, तिचे फोटो सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतात. संजय दत्तशी घटस्फोट झाल्यानंतर रिया पिल्लईने टेनिसपटू लिएंडर पेसला डेट केले होतं, या नात्यामुळे देखील बरीच चर्चा झाली. रिपोर्टनुसार असा दावा केला जातो की संजय दत्तशी लग्न करतानाही ती त्याच्याशी रिलेशनशिपमध्ये होती.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.