Sanjay Dutt : माझ्या 308 गर्लफ्रेंड्स…बॉलिवूड सुपरस्टारचा धक्कादायक खुलासा; रेखा यांच्यासोबतही अफेअरच्या चर्चा

Sanjay Dutt On His Girlfriends : बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तनं कपिल शर्माच्या शोमध्येत्याच्या 308 गर्लफ्रेंड्सबद्दल भाष्य केलेलं.

Sanjay Dutt : माझ्या 308 गर्लफ्रेंड्स...बॉलिवूड सुपरस्टारचा धक्कादायक खुलासा; रेखा यांच्यासोबतही अफेअरच्या चर्चा
| Updated on: Nov 28, 2026 | 1:40 PM

बॉलिवूडचा ‘संजूबाबा’ अर्थात अभिनेता संजय दत्त हा त्याच्या चित्रपटांइतकाच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याच्या अफेअर्सची आणि लग्नांची बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे चर्चा रंगली. टीना मुनीम, ऋचा शर्मा, रिया पिल्लई आणि माधुरी दीक्षित यांसारख्या अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. संजय दत्तच्या अफेअरबद्दल आजही अनेक किस्से सांगितले जातात. त्याच्या आयुष्यात तब्बल 308 मुली आल्याचा दावाही अनेकदा चर्चेत आला आहे.

संजय दत्तच्या आयुष्यातील सुरुवातीच्या प्रेमप्रकरणांपैकी एक म्हणजे अभिनेत्री टीना मुनीम हिच्यासोबतचं नातं. ‘रॉकी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांच्या नात्याची त्या काळात बरीच चर्चा झाली होती. मात्र, संजयच्या व्यसनांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. अखेर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Loading...

रिचा शर्मासोबत केलं पहिलं लग्न

टीनापासून वेगळं झाल्यानंतर संजयच्या आयुष्यात अभिनेत्री रिचा शर्मा आली. दोघांची भेट एका चित्रपटाच्या मुहूर्तादरम्यान झाली होती. पहिल्याच भेटीत संजय रिचाच्या प्रेमात पडला होता, असं सांगितलं जातं. पुढे दोघांनी 1987 मध्ये लग्न केलं. 1988 मध्ये रिचा आणि संजयला मुलगी झाली. त्यानंतर रिचाला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं आणि या आजाराशी झुंज देताना 1996 मध्ये रिचाचं निधन झालं. या घटनेचा संजयच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला.

 

 

माधुरी दीक्षितसोबतच्या अफेअरची रंगली चर्चा

संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची जोडी एकेकाळी प्रचंड लोकप्रिय होती. ‘साजन’, ‘खलनायक’, ‘थानेदार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. याच काळात त्यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा रंगू लागल्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, संजय दत्तच्या अटकेनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जातं. माधुरीसोबतच्या अफेअरनंतर संजयच्या आयुष्यात मॉडेल रिया पिल्लई आली. दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं. मात्र, त्यांचं वैवाहिक आयुष्य फार काळ टिकू शकलं नाही. काही वर्षांच्या संसारानंतर दोघे वेगळे झाले आणि 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. इतकंच नव्हे तर रेखा यांच्यासोबतही संजय दत्तचं नाव जोडलेलं. रेखा आणि संजय दत्त यांच्यातील अफेअरच्या चर्चा अभिनेत्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सुरू झाल्या. दोघं ‘जमीन आसमान’ या चित्रपटात एकत्र दिसले, ज्यामुळे या अफवांना सुरुवात झाली.

 

आयुष्यातील अनेक चढ-उतार आणि नात्यांमधील अपयशानंतर संजय दत्तच्या आयुष्यात मान्यता दत्त आली. दोघांनी 7 फेब्रुवारी 2008 रोजी लग्न केलं. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या चित्रपटातही त्याच्या प्रेमप्रकरणांचा उल्लेख करण्यात आला होता. तसंच कपिल शर्मा शोमध्ये संजय दत्तनं त्याच्या 308 गर्लफ्रेंड्सबद्दल भाष्य केलेलं. कपिल शर्मा संजय दत्तला विचारतो, ‘सर, तुम्हाला आठवतंय का तुमची पहिली गर्लफ्रेंड कधी होती?’ संजय दत्त उत्तर देतो, ‘मी तेव्हा खूप लहान होतो आणि माझ्या शेजारी माझा एक मैत्रीण होती.’ त्यावर कपिल उत्तर देतो, ‘तुम्ही सुरुवातीला शेजारच्या मुलींसोबत गर्लफ्रेंड बनवायला सुरुवात केली.’ संजय दत्त हसतो, ‘माझ्या आतापर्यंत 308 गर्लफ्रेंड्स झाल्या आहेत.’ अर्चना, संजय दत्तला विचारते, ‘मला जाणून घ्यायचं आहे की, हा आकडा कोणी मोजला.’

संजय दत्त पुढे सांगतो, ‘मी मोजलं नाही, पण माझ्या जवळच्या लोकांनी मोजलं.’ त्यावर कपिल शर्मा पुढे म्हणतो की, त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी अंदाज लावला आहे. कपिलच्या कमेंटला उत्तर देताना संजय दत्त म्हणतो, ‘हे अजून संपलेलं नाही, माझ्या अजूनही गर्लफ्रेंड्स होऊ शकतात.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us