AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP News: शरद पवारांवरील टिकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, विजय वडेट्टीवार यांना सुनावलं!

शरद पवार यांचा इतिहास हा खंजीर खुपसण्याचाच आहे. भाजपला साथ द्यायचा निर्णय बापलेकीने मिळून घेतलाय, सत्तेसाठी जगायचं अन् सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात असते, अशी टोकाची टिका केली होती. या टिकेवरुन आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिंकात शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेतला आहे.

NCP News: शरद पवारांवरील टिकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, विजय वडेट्टीवार यांना सुनावलं!
Sharad Pawar NCP News
| Updated on: Nov 28, 2026 | 1:37 PM
Share

NCP Sharad Pawar News:  शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेवरु काँग्रेस नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यावरुनच बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांचा इतिहास हा खंजीर खुपसण्याचाच आहे. भाजपला साथ द्यायचा निर्णय बापलेकीने मिळून घेतलाय, सत्तेसाठी जगायचं अन् सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात असते, अशी टोकाची टिका केली होती. या टिकेवरुन आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिंकात शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले शशिकांत शिंदे?

“विजय वडेट्टीवार यांच्यावर काही बोलायचे नाही, पण तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवू नका. पक्षाची धोरणे, पक्षाची भूमिका आम्ही स्वतंत्रपणे घेतो, आम्हाला अधिकार आहे. काँग्रेसचे पक्षाचे निर्णय घेताना तुम्ही आम्हाला विचारत नाही. शरद पवार साहेबांवर बोलल्यानंतर मला त्याच पद्धतीने उत्तर द्यावे लागेल, असे मला वाटते. डिलिमिटेशन दर २० वर्षांनंतर होत असते, दक्षिण भारतातही या निर्णयाला पाठिंबा दिला. सभागृहात विधेयक आल्यानंतर त्यावर चर्चा करतो. त्यात काही सुधारणा सुचवतो आणि आवश्यकतेनुसार बदलही होतात,” असं शशिकांत शिंदे म्हणालेत.

तसेच “सोमवारी आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. गल्लीतील नेत्यांनी एवढी घाई करण्याची गरज काय? पवार साहेब रुग्णालयात असल्यामुळे ते ऑनलाइन बैठकीत सहभागी होणार होते. सकाळपासून आमच्यावर टीका करायला सुरुवात केली. पवार साहेब गेले होते,” त्यावेळी ज्येष्ठतेच्या आधारावर निर्णय घेतला होता.

‘शरद पवार यांची माफी मागावी…’

दरम्यान, “सोमवारी आमची भूमिका बघून त्यांनी टीका किंवा निर्णय घ्यायला हवा होता. काही मतदारसंघ मोठे असल्यामुळे संपर्क साधणे अवघड होते. काँग्रेस याला कशासाठी विरोध करत आहे, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांना बोलण्याची घाई झाली. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना त्यांनी दहा वेळा विचार करायला हवा होता. त्यांनी शरद पवार यांची माफी मागावी,” असंही शशिकांत शिंदे म्हणालेत.

Follow Us
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ