AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Face Pack: हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा हे 3 फेस पॅक, चेहऱ्याला मिळेल नैसर्गिक चमक

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवामानामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि काळवंडलेली दिसू लागते. अशावेळी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हे ३ फेस पॅक वापरून त्वचेची काळजी घेता येऊ शकते.

Face Pack: हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा हे 3 फेस पॅक, चेहऱ्याला मिळेल नैसर्गिक चमक
face packImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 28, 2026 | 1:28 PM
Share

हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवामानाचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. या दिवसांत त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी झाल्यामुळे चेहरा निस्तेज, कोरडा आणि निर्जीव दिसू लागतो. काहींची त्वचा खडबडीत होते, तर काहींच्या चेहऱ्यावर काळवंडलेपणा दिसू लागतो. अशा वेळी त्वचेची योग्य काळजी घेणे आणि तिला आवश्यक ओलावा देणे महत्त्वाचे ठरते. यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक घटकांपासून फेस पॅक तयार करता येतात. हे फेस पॅक त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास, तिला मुलायम ठेवण्यास आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी करण्यास मदत करू शकतात. जाणून घेऊया हिवाळ्यात वापरता येणारे असे ३ फेस पॅक आणि ते तयार करण्याची योग्य पद्धत.

 नारळाचे दूध

हिवाळ्यासाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग फेस पॅकपैकी एक म्हणजे नारळाचे दूध आहे. नारळाचे दूध ओलावा टिकवून ठेवते. हे तुमच्या त्वचेची लवचिकता आणि पोत सुधारण्यास मदत करते. एक नारळ किसून घ्या आणि मिक्सरमध्ये थोडे पाणी वापरून चांगले मिक्स करा. नारळाचे दूध काढण्यासाठी ही पेस्ट गाळून घ्या. आता नारळाचे दूध कॉटन पॅडने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीने लावा. साधारण २० मिनिटे राहू द्या आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही हे रोज वापरले तर चांगला फायदा होईल.

हनी फेस पॅक

कोरड्या, पॅचेस असलेल्या त्वचेसाठी मध उत्तम आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते गुलाब पाण्यात मिक्स करणे. या दोन्ही गोष्टी त्वचेची दुरुस्ती आणि पोषण करू शकतात. हे तुम्हाला तेजस्वी चमक देऊ शकतात. हा पॅक बनवण्यासाठी २ चमचे मध घ्या आणि नंतर त्यात २ चमचे गुलाब जल घाला. हे चांगले मिक्स करुन घ्या. आता हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १० मिनिटे राहू द्या आणि नंतर नीट धुवा.

कच्च्या पपईचा फेस पॅक

कच्च्या पपईचा फेस पॅक असमान त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे तुमच्या निस्तेज आणि कोरड्या त्वचेला पोषण देतात आणि उजळ करतात. कच्चे दूध हे व्हिटॅमिन ईचे समृद्ध स्त्रोत आहे. हे कोरड्या त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि शांत करते. हे वापरून तुम्ही हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळवू शकता.

Follow Us
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले