AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sudhir Mungantiwar : वाघांच्या नसबंदीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या काकूनी उचललाय, त्यांनी आपलं वजन खर्च करून..सुधीर मुनगंटीवार यांचं मत

Sudhir Mungantiwar : "शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. सत्तेसाठी जन्माला आले, सत्तेसाठी मरायचं हे त्यांच्या डोक्यात आहे" अशा शब्दात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर टीका केली.

Sudhir Mungantiwar : वाघांच्या नसबंदीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या काकूनी उचललाय, त्यांनी आपलं वजन खर्च करून..सुधीर मुनगंटीवार यांचं मत
Sudhir mungantiwar
| Updated on: Nov 28, 2026 | 1:31 PM
Share

शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने डिलिमिटेशनच्या मुद्यावर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला हा निर्णय अजिबात पटलेला नाही. कालपासून शरद पवार यांच्यावर काँग्रेसकडून टीका सुरु आहे. आज महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. “शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. सत्तेसाठी जन्माला आले, सत्तेसाठी मरायचं हे त्यांच्या डोक्यात आहे” अशा शब्दात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतला आहे. “आधी ते पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. तेव्हा पवार उत्तम होते. राज्यसभेचे तिकीट दिले तेव्हाही उत्तम होते. मात्र मनाविरोधात वागले की टीका नको. सध्या विचार पटला नाही तर स्वतःचे विचार बदलण्याचा काळ आहे. खंजीर खुपसला असे म्हणण्याची आवश्यकता नाही” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “इंडिया आघाडी पवारांचे काहीही बिघडवू शकत नाही. बिघडायचेच असेल तर इंडिया आघाडीचे बिघडेल” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

वाघांच्या नसबंदीच्या विषयावर सुधीर मुनंगटीवार यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “वाघाच्या नसबंदीला केंद्र सरकार परवानगी देत नाही. मुख्यमंत्र्यांचे केंद्रात वजन आहे. हा विषय मुख्यमंत्र्यांच्या काकूंनी उचलला आहे. त्यांनी आपले वजन खर्च करून परवानगी आणावी. या आधी बिबट्याच्या नसबंदीबाबत परवानगी मागितली होती. मात्र केवळ पाच बिबट्यांबाबत परवानगी मिळाली. ती पुरेशी नव्हती” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

वाघांच्या नसबंदीची केंद्राकडे विशेष परवानगी मागितली

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव वन विभागाने केंद्र सरकारकडे सादर केलाय. वाघांच्या नसबंदीची परवानगी मागण्यात आलेला चंद्रपूर जिल्हा हा देशातला एकमेव आणि पहिला जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची वाढती संख्या आणि यामध्ये माणसांचे आणि पाळीव प्राण्यांचे जात असलेले बळी पाहता वनविभागाने वाघांच्या नसबंदीची केंद्राकडे विशेष परवानगी मागितली आहे. यासाठी सातत्याने वनविभाग केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे.

वन विभागाच्या मुख्यालयावर धडक मारली

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, राज्याच्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी मुल तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेत चंद्रपूर वन विभागाच्या मुख्यालयावर धडक मारली. यावेळी त्यांनी वाघांच्या संख्येवर तातडीने नियंत्रण मिळवण्या सोबतच इतर अनेक मागण्या वन विभागाकडे केल्या. यावेळी त्यांना उत्तर देताना चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी वाघांच्या नसबंदीची केंद्राकडे मागणी करण्यात आल्याची अत्यंत महत्त्वाच्या माहिती दिली.

Follow Us
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
Varsha Gaikwad : Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठा भूकंप; वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले