Satish Pulekar : चांगली मैत्री होती ती संपली…नाना पाटेकर यांच्याबद्दल स्पष्टच बोलले सतीश पुळेकर

Satish Pulekar On Nana Patekar : सतीश पुळेकर आणि नाना पाटेकर यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यातली मैत्री तुटली. याबद्दल एका मुलाखतीत सतीश यांनी भाष्य केलेलं.

Satish Pulekar : चांगली मैत्री होती ती संपली...नाना पाटेकर यांच्याबद्दल स्पष्टच बोलले सतीश पुळेकर
| Updated on: Oct 14, 2026 | 5:54 PM

सुप्रसिद्ध अभिनेते सतीश पुळेकर आणि नाना पाटेकर यांच्या मैत्रीच्या चर्चा इंडस्ट्रीत व्हायच्या. दोघेही संघर्षाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. नाना पाटेकर सतीश यांच्या घरी जेवायला जायचे. काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अनेक कलाकार नानांच्या आठवणी सांगत आहेत. त्यातच नाना पाटेकर हयात असताना सतीश पुळेकर यांनी दिलेली ही मुलाखत आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत सतीश यांना नाना पाटेकर यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आलेलं.

काय म्हणाले सतीश पुळेकर?

Loading...

‘मित्र म्हणे‘ या पॉडकास्टमध्ये सौमित्र पोटेनं सतीश यांना विचारलं की, ‘एकेकाळी नाना पाटेकर आणि तुमची खूप मैत्री होती, त्याचे अनेक किस्से आहेत.’ त्यावर सतीश पुळेकर म्हणाले, ‘हो. मित्र…जरा कठीण आहे. कारण माझे मित्र या क्षेत्रातले नाहीत. फक्त विनय आपटे या क्षेत्रातला मित्र. म्हणजे बाकीचे मित्र आहेत. शाळेतले, कॉलेजमधले आहेत. एक माझा चौथीपासूनचा मित्र आहे. तो नेहमी येतो माझ्याकडे. तसेच विजय क्लबमधले मित्र आहेत.’

पुढे नाना पाटेकर यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल विचारलं असता सतीश पुळेकर म्हणाले की, ‘नाही. मला असं वाटतं की…मला माफ करा हा विषय नको, त्याचं कारण असं की, एवढी चांगली मैत्री होती ती संपली. ज्यावेळी अविष्कारमध्ये मी होतो, त्यावेळी जयदेव हट्टंगडी एका एकांकिकेचं दिग्दर्शन करत होते. जी पु. ल. यांच्या ‘म्हैस ‘या कथेवर आधारित होती. त्यात मी रोल करत होतो आणि बरीच मंडळी होती. मला जयदेव म्हणाले की ‘सूत्रधाराच्या भूमिकेसाठी कोणी असेल तर बघ ना.’ मी म्हटलं की, मी आणतो. आता गंमत अशी की नाटकात येण्याआधी मी नानाकडे असायचो किंवा नाना माझ्याकडे असायचा, नाहीतर तो माझ्या क्लबच्या इथे यायचा. आम्ही एकांकिका करायचो. गजानन गोखलेंनी नाट्यकेदार नावाची एक संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेत सुनील जोशी, उदय म्हैसकर, मी आणि नाना आम्ही एकांकिका करायचो. तिथे नानाला मी घेऊन गेलो होतो. अविष्कारमध्येही मीच घेऊन गेलो होतो.’

‘तो सतत ‘मला काम करायचंय, मला रोल करायचाय’ असं मला सांगत असायचा. मग मी म्हटलं नाना ये इथे. मग मी जयदेवकडे त्याची ओळख करून दिली. त्या एकांकिकेचे फक्त दोनच प्रयोग झाले. मग नाना तिथे राहिला. पहिलं गौराई नावाचं एक नाटक होतं, राज्य स्पर्धेसाठी.. त्यात त्याने काम केलं आणि मग त्याचं सगळं सुरू झालं.’ असं सतीश यांनी शेवटी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us