AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप्पा आमच्या लग्नाला ये..; मराठमोळ्या अभिनेत्रीने लालबागच्या राजाला दिलं पहिलं आमंत्रण, होणाऱ्या नवऱ्यासोबत घेतलं दर्शन

या मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी यंदाचा गणेशोत्सव आणखी खास ठरला आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेल्या अभिनेत्रीने लग्नाच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

बाप्पा आमच्या लग्नाला ये..; मराठमोळ्या अभिनेत्रीने लालबागच्या राजाला दिलं पहिलं आमंत्रण, होणाऱ्या नवऱ्यासोबत घेतलं दर्शन
मराठी अभिनेत्री भाग्यश्री दळवीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 24, 2026 | 11:34 AM
Share

Lalbaughcha Raja: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री दळवी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली भाग्यश्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा पार पडला होता. आता लग्नाची तयारी सुरू असतानाच भाग्यश्रीने तिच्या आयुष्यातील या खास सोहळ्याचं पहिलं आमंत्रण थेट लालबागच्या राजाला दिलं आहे. होणारा पती सुमेध म्हात्रे याच्यासोबत भाग्यश्रीने बाप्पाचं दर्शन घेतलं आणि लग्नाची पत्रिकाही बाप्पाच्या चरणी ठेवली.

बाप्पाला दिलं लग्नाचं खास आमंत्रण

भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लालबागच्या राजाच्या दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती होणारा पती सुमेधसोबत बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दोघांनी मिळून त्यांच्या लग्नाची पत्रिका लालबागच्या राजाच्या चरणी ठेवली. यावेळी त्यांनी बाप्पाला आपल्या लग्नाला येण्याचं खास निमंत्रण दिलं. भाग्यश्रीने या पोस्टसोबत लिहिलं, ‘बाप्पा आमच्या लग्नाला ये…’ तसंच सुमेधला उद्देशून तिने ‘सर्व गोष्टींसाठी धन्यवाद सुम्या’ असंही लिहिलं आहे. लग्नपत्रिकेवरही ‘बाप्पा लग्नाला ये… सुमेध आणि भाग्यश्री’ असा मजकूर असल्याचं पाहायला मिळतं.

पहा व्हिडीओ-

14 वर्षांची मैत्री आणि आता लग्न

भाग्यश्री आणि सुमेध यांचं नातंही खास असल्याचं समोर आलं आहे. दोघं गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. सोशल मीडिया पोस्टमधून भाग्यश्रीने त्यांच्या नात्याबाबत संकेत दिले होते. एका पोस्टमध्ये तिने ‘मैत्रीची 14 वर्षे’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे अनेक वर्षांची मैत्री आता प्रेमात आणि त्यानंतर लग्नाच्या नात्यात बदलली असल्याचं दिसत आहे.

भाग्यश्रीने आतापर्यंत ‘दार उघड बये’, ‘सांग तू आहेस का?’ आणि ‘खरंच तिचं काय चुकलं’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील ताराच्या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

साखरपुड्यानंतर आता भाग्यश्री-सुमेधच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. मात्र त्यांच्या विवाहाची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. लालबागच्या राजाच्या चरणी पत्रिका ठेवून भाग्यश्रीने या नव्या आयुष्याची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या या खास पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Follow Us
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?