AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khamenei: खामेनेईंनी धर्माच्या नावावर फक्त…, इराणच्या अभिनेत्रीकडून मोठं सत्य उघड

Khamenei: अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई ठार झाले आहेत. खामेनेई यांच्या निधनानंतर इराण येथील एका अभिनेत्री एक मोठं सत्य समोर आणलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगलेली आहे.

Khamenei:  खामेनेईंनी धर्माच्या नावावर फक्त...,  इराणच्या अभिनेत्रीकडून मोठं सत्य उघड
Elnaaz Norouzi
| Updated on: Mar 05, 2026 | 8:40 AM
Share

Khamenei: अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात तणावग्रस्त वातावरण आहे. फक्त इराणमध्येच नाही तर, भारतात देखील खामेनेई यांच्या निधनानंतर शिया मुस्लीम यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर इराण येथील अभिनेत्री एल्नाझ नोरौजी हिने खामेनेई यांच्या निधनानंतर मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री एल्नाझ नोरोझी हिने एका मुलाखतीत खामेनेई यांच्या निधनाच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या शोक आणि निदर्शनांवर टीका केली. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनाबद्दल निषेध आणि शोक व्यक्त करणाऱ्यांकडे अचूक माहिती नसल्याचं आणि त्यांना वस्तुस्थिती माहिती नसल्याचंही तिने म्हटलं आहे.

एल्नाझ नोरौजी म्हणाली, ‘हे प्रचंड दुःखद आहे. मला असं वाटतं की, आंदोलन करणाऱ्यांना अनेक गोष्टी माहिती नाहीत, म्हणून असं होतं आहे. त्यांना नाही माहिती की, धर्माच्या नावावर खामेनेई यांनी किती लोकांवर अत्याचार केले आहेत. खामेनेई यांनी किती लोकांची हत्या केली आहे… आंदोलकांना काहीही माहिती नाही, त्यांना फक्त एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे, खामेनेई धार्मिक नेते आहेत आणि लोकांनी त्यांचं अनुकरण केलं…’

‘प्रत्येक जण युद्धामुळे त्रासलेला आहे. पुढे काय होणार याबद्दल प्रत्येक जण भयभीत आहेत. स्थिती प्रचंड अनिश्चित आहे पण इराणमधील अधिकांश लोक बदलाच्या प्रतिक्षेत आहेत. गेल्या 47 वर्षांपासून इराण येखील लोकांना बदल हवे आहेत. लोकांना घरात सुरक्षित राहण्यासाठी सांगण्यात येत आहे. कारण त्यांना माहिती आहे की, अमेरिका आणि इस्रायल कधीच त्यांच्यावर हल्ले करणार नाही… ते विशेषतः आयआरजीसी आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. मी काल रात्री माझ्या कुटुंबाशी बोलले आणि ते ठीक आहेत. असं देखील अभिनेत्री एल्नाझ नोरौजी म्हणाली.

एल्नाझ नोरौजी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा जन्म इराण याठिकाणी झाला. त्यानंतर एल्नाझ जर्मनीत गेली. त्यानंतर भारतात तिने स्वतःची ओळख भक्कम केली… एल्नाजने जर्मनीमध्ये शिक्षण घेतलं आणि तिथेच मॉडेलिंग सुरू केली. तिने भारतातही करिअर केलं. तिने लोकप्रिय नेटफ्लिक्स सिरीज सेक्रेड गेम्समध्ये काम केले, ज्यामध्ये तिने झोया मिर्झाची भूमिका साकारली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...