Me Too प्ररकणी अनू मलिकांविरोधात महिला आयोगाचा मोठा निर्णय

लैंगिक शोषण प्रकरणी बॉलिवूड गायक, संगीतकार आणि इंडियन आयडल 11 चे माजी जज अनू मलिक यांना दिलासा मिळाला आहे. अनू मलिक यांच्याविरोधात कुठलेही सबळ पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधातील प्रकरण तात्पुर्त बंद करण्यात आलं आहे.

Sexual harassment case against Anu Malik, Me Too प्ररकणी अनू मलिकांविरोधात महिला आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई : लैंगिक शोषण प्रकरणी बॉलिवूड गायक, संगीतकार आणि इंडियन आयडल 11 चे माजी जज अनू मलिक यांना दिलासा मिळाला आहे (Sexual harassment case). अनू मलिक यांच्याविरोधात कुठलेही सबळ पुरावे नसल्याने त्यांच्याविरोधातील प्रकरण तात्पुर्त बंद करण्यात आलं आहे. हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोग हाताळत होतं. मात्र, पुराव्यांअभावी हे प्रकरणं सध्या बंद करण्यात आलं आहे (Anu Malik).

प्रकरण बंद होण्याचं कारण?

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रीय महिला आयोगच्या अंतर्गत सचिव भरनाली शोम यांनी 3 जानेवारी 2020 ला सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्राइवेट लिमिटेडच्या माधुरी मल्होत्रा यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी गायिका सोना महापात्राच्या ट्वीटला मेंशन केलं होतं. ट्वीटनुसार, अनेक महिलांनी अनू मलिकवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतरही त्यांना तरुणांच्या एका कार्य़क्रमात जज बनवण्यात आलं. या प्रकरणी 6 डिसेंबर 2019 ला तुमचं उत्तर आयोगाला मिळालं आहे. परिस्थिती पाहता, तक्रारकर्त्याकडून संवादाचा अभाव आणि ठोस पुरावे न मिळू शकल्याने आयोगाने हे प्रकरण बंद केलं आहे, असं या पत्रात सांगण्यात आलं.

“तक्रारकर्त्याला याबाबत माहिती कळवली होती. यावर तक्रारकर्तीने कळवलं की ती सध्या प्रवास करत आहे, परत आल्यावर भेट देईल. आयोगने 45 दिवसांपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि कागदपत्रांचीही मागणी केली, मात्र, त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलेलं नाही. अनू मलिक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या इतर महिलांकडूनही काहीही उत्तर आलं नाही”, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मुंबई मिररशी बोलताना दिली.

तात्पुर्ती स्थगिती का?

हे प्रकरण तात्पुर्त स्थगित करण्यात आल्यामुळे अनू मलिक यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, अनू मलिकच्या समस्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत. जर तक्रारकर्ती पुरावे घेऊन आली तर या प्रकरणावर पुन्हा काम केलं जाईल, असंही रेखा शर्मा यांनी सांगितलं.

Sexual harassment case against Anu Malik

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *