Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या सावलीसारखी राहणाऱ्या पूजा ददलानीने कोट्यवधी खर्चून मुंबई घेतले 3 लग्झरी फ्लॅट्स; नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क
शाहरुख खान प्रमाणेच त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील चर्चेत असते. ती स्वत: प्रचंड श्रीमंत असून नुकतेच तिने कोट्यवधी खर्चून मुंबईत 3 फ्लॅट खरेदी केलेत.

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) बॉलीवूडचा मोठा सुपरस्टार आहे. त्याला हिंदी चित्रपटसृष्टीचा बादशाब म्हटलं जातं. 3 दशकांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या शाहरुखने एकाहून एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि मोठी कमाई देखील केली. त्याच्याकडे 10 हजार कोटींची संपत्ती असून तो इंडस्ट्रीमधील सर्वांत श्रीमंत अभिनेताही आहे. दुसरीकडे शाहरुखप्रमाणेच त्याचे कुटुंबीय, तसेच त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील चर्चेत असते. तिच्या बद्दल जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता असते. ती स्वत: ही खूप श्रीमंत आहे. अनेक कार्यक्रमांत , ती शाहरुखसोबत दिसली आहे. शाहरुखसाठी काम करायच्या आधी तिने अनेक मोठ-मोठ्या स्टार्ससोबत कोलॅबोरेट केलंय. नुकताच पूजाने मोठी गुंतवणूक केली आहे. तिने कोट्यावधी खर्चून मुंबईत 3 फ्लॅट विकत घेतलेत.
देशातील सर्वांत श्रीमंत शहरांपैकी एक असलेल्या मुंबईत राहणं हे काही खायचं काम नाहीये. मात्र पूजा ददलानेनी अथक मेहनत करत करिअर घडवलं आणि खूप कमाई देखील केली. तब्बल 38 कोटी रुपये खर्च करून तिने मुंबईत 3 फ्लॅट विकत घेतले.
किती आहे पूजाची सॅलरी आणि नेटवर्थ ?
यामुळे अनेक चाहतेही हैराण झालेत. कारण पूजाने फक्त 1 नव्हे, तर तब्बल 3-3 लग्झरी अपार्टमेंट्स मुंबईत खरेदी केलेत. ती स्वत: एखाद्या स्टारपेक्षा काही कमी नाही, तिचंही मोठं फॅन फॉलोइंग आहे. पूजा ददलानीच्या सॅलरी बद्दल सांगायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार, तिचा दर महिन्याचा पगार हाँ 70 लाख रुपये आहे. शाहरुखचे पर्सनल फंड्स तसेच रेड चिलीज आणि कोलकाता नाइट रायडर्स मॅनेज करण्यासाठी तिला दरवर्षी जवळपास 9 कोटी रुपये एवढी प्रचंड रक्कम सॅलरी म्हणून मिळते. तिच्या संपत्ती बद्दल बोलायचं झाल्यास, सोर्सनुसार, तिचं नेटवर्थ 50 कोटींच्या आसपास आहे. मुंबईतील बांद्रा येथे तिचं आलिशान घरं असून, शाहरुख खानची पत्नी गौरी हिनेच ते डिझाईन केलं आहे.
दीपिकाचीही होती मॅनेजर
2012 साली पूजा ददलानी ही शाहरुख खान आणि त्याच्या कंपनीशी जोडली गेली. आता दोघांच्याही कुटुंबात खूप चांगलं बाँडिंग आहे. ती शाहरुखच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. दोघांच्या कोलॅबरेशनला 14 वर्ष झाली आहेत. याआधी ती अभिनेत्री दीपिका पडूकोण हिची मॅनेजर म्हणून काम करत होती.