मंगळवारी पठाण सिनेमाच्या कमाईत मोठी घट, फक्त इतक्या कोटींची कमाई

बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान स्टारर 'पठाण' सिनेमाची क्रेझ होतेय कमी? सातव्या दिवशी पठाणच्या कमाईला ब्रेक... पाहा सातव्या दिवशी सिनेमाने किती कोटी रुपयांचा गल्ला केला गोळा...

मंगळवारी  पठाण सिनेमाच्या कमाईत मोठी घट, फक्त इतक्या कोटींची कमाई
मंगळवारी पठाण सिनेमाच्या कमाईत मोठी घट, फक्त इतक्या कोटींची कमाई
| Updated on: Feb 01, 2023 | 11:37 AM

Pathaan Box Office Day 7 : अभिनेता शाहरुख खान स्टारर पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर होत असलेल्या कोट्यवधींच्या कमाईमुळे चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली. तर तिसऱ्या दिवशी सिनेमाची कमाई फार कमी झाली. त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. पण साहव्या आणि सातव्या दिवशी मात्र पठाण सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. मंगळवारी सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. रिपोर्टनुसार सातव्या दिवशी म्हणजे मंगळवारी सिनेमाने फक्त २१ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहाव्या दिवशी सिनेमाने २५.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात सिनेमाने आतापर्यंत ३१७.५० कोटी रुपयांता गल्ला जमा केला आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात सिनेमा किती रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर जगभरात सिनेमाने ६४० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

 

 

साहव्या आणि सातव्या दिवशी सिनेमाची कमाई समाधान कारक झाली नसली तरी, आतापर्यंतच्या इतिहासात कमी कालावधीमध्ये जास्त कमाई करणार पठाण एकमेव सिनेमा ठरला आहे. सहा दिवसांमध्ये पठाण सिनेमाने अनेक विक्रम रचले आहे. पठाण सिनेमाची कामगिरी पाहून बॉलिवूडचे चांगले दिवस आले आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक सेलिब्रिटींनी केली आहे.

 

 

सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी साकारलेल्या भूमिकांची देखील चर्चा रंगत आहे. पठाण सिनेमात दीपिका जबरदस्त अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. शिवाय सलमान खानची एक अप्रतिम कॅमिओ भूमिका चाहत्यांच्या मनात घर करत आहे. म्हणून पुन्हा मोठ्या पडद्यावर शाहरुख आणि सलमान खान यांना पाहणं चाहत्यांसाठी खास आहे.

महत्त्वाचं शाहरुख खान याने मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पुन्हा पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण कोणत्याही वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही.