AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shakira | शकीराच्या नव्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ, आतापर्यंत साडेतीन लाख लोकांनी पाहिले हे गाणे

कोलंबियन गायिका गीतकार, संगीतकार, डान्सर शकीराचे (Shakira) चाहते नेहमीच तिच्या डान्सची आणि गाण्यांची झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. शकीराचे कुठलेही गाणे रिलीज झाले की, ते गाणे हिट होतेच.

Shakira | शकीराच्या नव्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ, आतापर्यंत साडेतीन लाख लोकांनी पाहिले हे गाणे
| Updated on: Dec 05, 2020 | 7:22 PM
Share

मुंबई : कोलंबियन गायिका गीतकार, संगीतकार, डान्सर शकीराचे (Shakira) चाहते नेहमीच तिच्या डान्सची आणि गाण्यांची झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. शकीराचे कुठलेही गाणे रिलीज झाले की, ते गाणे हिट होतेच. शकीराचे चाहते फक्त कोलंबियातच नसून संपूर्ण जगात तिचे चाहते आहे. भारतात देखील शकीराचा चाहता वर्ग मोठा आहे. अलीकडेच शकीराच्या नवीन गाण्याचे टीझर रिलीज झाले आहे. जे चाहत्यांना खूपच आवडले आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर आता शकीराने अखेर तिचे ‘Girl Like Me’ हे नवीन गाणे लॉन्च केले आहे. या गाण्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.(Shakira’s new song hits the internet)

View this post on Instagram

A post shared by Shakira (@shakira)

शकीराचे कोणतेही गाणे रिलीज झाले की, ते गाणे हिटच होते. अशा परिस्थितीत युट्यूबवर ‘Girl Like Me’ हे गाणे रिलीज होताच हे गाणेही चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. आतापर्यंत साडेतीन लाख लोकांनी हे गाणे यूट्यूबवर पाहिले आहे. हे गाणे रिलीज होण्यापूर्वी शकीराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसाठी याबद्दल पोस्ट करून माहिती दिला होती. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ब्लॅक आयड मटरसह गर्ल लाइक मी चा व्हिडिओ लवकरच येत आहे. शकीराचे हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. तिच्या गाण्यांने आणि डान्सने चाहते घायाळ होत आहेत. आणि तिच्या गाण्यांवर चाहते कॅमेंटचा पाऊस पाडत आहेत. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचे एक गाणे नुकतेच प्रदर्शित होते ‘बिग बॉस 13’मध्ये सिद्धार्थ आणि शहनाझ या जोडीला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. सिद्धार्थ आणि शहनाझचा कोणताही फोटोशूट, व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होतो. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ आणि शहनाझ यांचे ‘शोना शोना’ हे गाणे प्रसिद्ध झाले होते. हे गाणं टोनी कक्कर आणि नेहा कक्कड़ यांनी गायलं होते. सिद्धार्थ शुक्ला याने या गाण्याचे पोस्टर (24 नोव्हेंबर) इंन्सटाग्रामवर पोस्ट केले होते. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले होते की, ‘या गाण्यात शहनाझ आणि सिद्धार्थची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.’ या गाण्याचे पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि शहनाझ रेट्रो स्टाईलमध्ये दिसले होते. शहनाझ गिलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सॉन्गचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. पोस्टरमध्ये दोघेही रोमँटिक स्टाईलमध्ये एकमेकांना पहात होते. सिद्धार्थ आणि शहनाझ यांचे हे एकत्र दुसरे गाणे होते. यापूर्वी टोनी आणि नेहा कक्कर यांनी सिद्धार्थबरोबर हार्ट ब्रेकिंग सॉंगमध्ये काम केले होते. सिद्धार्थ आणि शहनाझ या जोडीला त्यांचे चाहते सिड नाज म्हणतात. विशेष म्हणजे सिडनाझचे लाखो चाहते आहेत.

संबंधित बातम्या :

Sunny Leone | एलियन्सनी अभिनेत्री सनी लिओनीचा मस्करा चोरून नेला, मग तिने काय केले पाहा…

Kangana Ranaut : पंजाबच्या रस्त्यांवर कंगनाची शस्त्रक्रिया, व्हायरल फोटो बघून तुम्हालाही येईल हसू

Kangana Ranaut | कॉंग्रेसच्या खासदाराने कंगनाला डिवचले, म्हटले हिमाचलचा सडलेला सफरचंद

(Shakira’s new song hits the internet)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.