AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शमिता शेट्टी हिचा एक्स-बॉयफ्रेंड Raqesh Bapat ची प्रकृती खालावली; रुग्णालयातील फोटो समोर

शमिता शेट्टी हिचा एक्स-बॉयफ्रेंड राकेश बापट याला नक्की झालं तरी काय? अभिनेत्याचा रुग्णालयातील फोटो समोर, चाहत्यांकडून चिंता व्यक्त

शमिता शेट्टी हिचा एक्स-बॉयफ्रेंड Raqesh Bapat ची प्रकृती खालावली; रुग्णालयातील फोटो समोर
| Updated on: Aug 01, 2023 | 2:16 PM
Share

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राकेश याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याच्या हाताला ड्रिप लागल्याचं दिसून येत आहे. पण फोटोमध्ये अभिनेत्याचा चेहरा दिसत नाही. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करताच अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहते देखील चिंता व्यक्त करत राकेश याला नक्की झालं तरी काय? असं विचारत आहेत. पण अभिनेत्याला नक्की काय झालं असेल… याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्याने पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगत आहे.

अनेक मालिका, सिनेमे आणि बिग बॉसमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या राकेश बापट याची प्रकृती खालावली आहे.. असं अभिनेत्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कळत आहे. अभिनेता बेडवर झोपला असून त्याच्या हाताला ड्रिप असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. अभिनेत्याचा फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

राकेश बापट फक्त त्याच्या खासगी नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. बिग बॉसमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली. पण अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

शमिता शेट्टी हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर राकेश पोस्ट करत म्हणाला, ‘मला सर्वांना सांगायचं आहे की, मी आणि शमिता आता विभक्त झाले आहोत. ऐकून तुम्हाला वाईट वाटेल. तुम्ही आम्हा दोघांवर पूर्वीप्रमाणे प्रेम कराल अशी आशा करतो…’ असं राकेश म्हणाला होता. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं पण राकेश आणि शमिता यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

राकेश बापट याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सात फेरे’, ‘होंगे जुदा ना हम’, ‘कुबूल है’, ‘ये है आशिकी’, ‘बहु हमारी रजनीकांत’ आणि ‘इश्क में मरजावां’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर अभिनेत्याने राज्य केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...