Ramayana : रामायण सिनेमात रावणाच्या भूमिकेला दिला ‘या’ मराठी अभिनेत्यानं आवाज, सांगितला डबिंगचा अनुभव

'बाहुबली', 'सालार' आणि 'आदिपुरुष' सारख्या चित्रपटांमध्ये प्रभाससाठी हिंदी डबिंग करणाऱ्या मराठी अभिनेत्याने रामायणात यशच्या आवाजासाठी डबिंग केले आहे. हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वात थकवणाऱ्या डबिंग अनुभवांपैकी एक होता. असे तो म्हणाला वाचा सविस्तर

Ramayana :  रामायण सिनेमात रावणाच्या भूमिकेला दिला या मराठी अभिनेत्यानं आवाज, सांगितला डबिंगचा अनुभव
yash in ramayan
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 07, 2026 | 7:07 PM

रावणाच्या भूमिकेला हिंदीत आवाज देणं शरद केळकरसाठी अजिबात सोपं नव्हतं.’रामायण’ चित्रपटात यशने रावणाची भूमिका साकारली आहे, पण त्याला आवाज हा शरद केळकरने दिला आहे. शरदने हिंदीच्या भागासाठी यशच्या भूमिकेला आवाज दिला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शरदने डबिंग करताना आलेल्या अडचणी आणि चित्रपटातील आवडते प्रसंगही उघड केले आहेत.

शरदने केळकरने ‘व्हरायटी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं कि, दिग्दर्शक नितेश तिवारी आणि चित्रपटाच्या मुख्य टिमने यशच्या रावणाच्या भूमिकेसाठी हिंदी डबींग करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती. शरदची नितेश तिवारी यांच्यासोबत काम करण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. मागच्या वर्षी रबी दुबेच्या घरी त्यांची नितेश यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी त्याने काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अखेर रामायणाच्या निमित्ताने त्याला संधी मिळाली असे शरदने सांगितले.

Loading...

यश हिंदी भाषा चांगल्या प्रकारे बोलतो. मात्र त्याची मातृभाषा कन्नड असल्यामुळे हिंदी शब्दांचा उच्चार आणि बोलण्याची लय यात फरक जाणवतो. त्यामुळे हिंदी आवृत्तीत त्याच्या भूमिकेसाठी वेगळा आवाज देण्याचा निर्णय घेतला गेला. शरदने सांगितले कि डबींग दरम्यान त्याचे यशसोबत बोलणे व्हायचे. काही प्रसंग चांगले कसे करता येतील, याबाबत यश स्वत:देखील सूचना द्यायच्या, दोघांमध्ये चांगला सन्मवय होता. असे शरदने सांगितले.

शरदने हा अनुभव त्याच्या सर्वात थकवणाऱ्या डबींग अनुभवांपैकी एक असल्याचं सांगितलं, त्याच्या मते रावणाची भूमिका यशच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण भूमिकांपैकी एक आहे. चित्रपटात रावणाची पार्श्वभूमी आणि तो लंकेचा राजा होण्यापूर्वीचा प्रवासही दाखवण्यात आला आहे.

चित्रपटातील आवडत्या प्रसंगाबद्दल विचारलं असता शरदने तीन प्रसंगांचा उल्लेख केला. यात रावणाची दहा तोंड दिसणारा प्रसंग, विद्यूतजिव्हाचा प्रसंग आणि सुरूवातीला रावण ब्रम्हदेवाकडून वरदान मागतो तो प्रसंग त्याला विशेष आवडला.

वरदाना मागतानाच्या प्रसंगात रावण सुरूवातीला अशक्त आणि दूर्बल दिसतो. मात्र त्याची शक्ती वाढत जाते तसतसा त्याच्या आवाजातही रूबाब आणि अहंकार जाणवू लागतो.रावण हा बुद्धीमान आणि अभ्यासू व्यक्ती असल्याने डबिंग करताना त्याच्या आवाजात गोंधळ आणि संभ्रम जाणवणार नाही, याची शरदला काळजी घ्यावी लागली होती.

शरदच्या मते, रावण आपल्या दहा मस्तकांशी संवाद साधत युद्ध करावं कि थांबावं,याचा विचार करतो तो प्रसंग त्याला सर्वाधिक आवडला. नितेश तिवारी आणि यश यांनी हा प्रसंग अतिशय प्रभावीपणे साकारल्याचंही त्याने सांगितलं

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us