AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Makeup Tips: लक्ष्मीपूजनासाठी झटपट तयार व्हायचंय? फक्त 10 मिनिटांत करा मेकअप, मिळवा सुंदर लूक

10 Minutes Instant Makeup: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील कामे, पूजेची तयारी याची बरीच धावपळ असते. त्यात मेकअप करायला निवांत वेळ नसतो. अशा वेळी या इंस्टंट टिप्सने तुम्ही १० मिनीटात मेकअप करु शकता.

Diwali Makeup Tips: लक्ष्मीपूजनासाठी झटपट तयार व्हायचंय? फक्त 10 मिनिटांत करा मेकअप, मिळवा सुंदर लूक
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Nov 07, 2026 | 6:59 PM
Share

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांची सकाळपासूनच लगबग सुरू असते. घराची साफसफाई, सजावट, फराळाची तयारी आणि पूजेची धावपळ यात स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी मेकअपसाठी तासन् तास घालवण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही अवघ्या १० मिनिटांत सुंदर आणि आकर्षक लूक मिळवू शकता. विशेष म्हणजे, हा मेकअप नॅचरल दिसतो आणि तुमचा वेळही वाचवतो. मात्र, मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर लावा.

सीसी क्रीम लावा सीसी क्रीम बीबी क्रीमपेक्षा जास्त अॅडव्हान्स आहे. त्याचा जाड थर तुमच्या चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर सीसी क्रीम लावा. तुम्हाला खूप कमी प्रमाणात सीसी क्रीम लावावे लागेल.

काजळ लावा काजळ लावल्याने तुमचे डोळे चांगले ठळक होतील. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही काजळ वापरू शकता. शक्यतो काजळ स्मज फ्री वापरा.

लिपस्टिक लावा डल चेहरा देखील ब्राइट करण्यात लिपस्टिकचा चांगला वाटा आहे. अशा स्थितीत सणासुदीला तुम्ही ब्राइट किंवा डार्क रंगाची लिपस्टिक लावू शकता. लिपस्टिक लावल्याने तुमचा मेकअप पूर्ण होईल.

ब्लश लावा जर तुमच्याकडे ब्लशर नसेल तर तुम्हाला यासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही लिपस्टिकमधून ब्लशर बनवू शकता. तुमच्या गालावर थोड्या प्रमाणात लिपस्टिक लावा आणि ते चांगले ब्लेंड करा. लक्षात ठेवा की तुम्हाला जास्त लिपस्टिक वापरण्याची गरज नाही.

मस्कारा मस्कारा देखील तुम्ही इंस्टंट लावू शकता. यामुळे तुमच्या पापण्या जाड दिसतील. शेवटी मस्करा लावा. यामुळे तुमचे डोळे खूप सुंदर दिसतील. याने तुमचा मेकअप पूर्ण होतो.

Follow Us
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!