AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकतंच भाजप सोडून गेलेल्या बड्या नेत्याला मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्रीने वाचवलं, नेमकं प्रकरण काय?

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि अभिनेत्री स्वरा भास्कर 'राईज अँड फॉल'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले आहेत. या शोमध्ये सिवेत तोमर आणि शहजाद पूनावालाचे काही कारणामुळे वाजले, ते कारण काय ते जाणून घ्या...

नुकतंच भाजप सोडून गेलेल्या बड्या नेत्याला मारहाण, प्रसिद्ध अभिनेत्रीने वाचवलं, नेमकं प्रकरण काय?
| Updated on: Sep 29, 2026 | 1:49 PM
Share

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि अभिनेत्री स्वरा भास्कर ‘राईज अँड फॉल’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले आहेत. या पर्वाची सुरुवात दणक्यात झाली. शहजाद पूनावाला आणि अभिनेता सिवेत तोमर यांच्यात वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. मात्र, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून स्वरा आणि इतर स्पर्धकांनी हस्तक्षेप केला.

नेमकं काय घडलं?

शहजाद सतत स्वरा भास्कर आणि सिवेत तोमर यांना लक्ष्य करत होता. तो म्हणाला, “त्या सिवेतचा कणा बघा! स्वरा भास्करसोबत बसलेला मला लेक्चर देतोय. दादा, हा ढोंगीपणा आहे. जा रे दादा, युती कर. ही युती आहे! सिवेतचा टॅटू घेऊन फिरणारा स्वरा भास्करसोबत बसला आहे.” शहजाद असे ओरडत असताना स्वराने हस्तक्षेप केला.

शहजादचे शब्द ऐकून सिवेत तोमरचा संताप अनावर झाला. तो पटकन शहजादच्या दिशेने गेला, पण स्वराने त्याला थांबवले आणि मारू नकोस असे सांगितले. दरम्यान, सिवेतची शहजाद पूनावालासोबत झटापट सुरू झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून इतर स्पर्धक मध्यस्थी करण्यासाठी धावून आले. शहजाद पूनावाला आधीच खाली पडला होता. तोमर एवढ्यावरच थांबला नाही; लोकांनी त्याला बाजूला खेचताच त्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शहजादनेच सिवेतला चिथावले आणि त्यामुळेच प्रकरण चिघळले, असे आरोप केले जात आहेत.

या घटनेनंतर, पूनावालाने कॅमेऱ्यासमोर आपला फाटलेला कुर्ता दाखवताना दिसला, ज्यामुळे शोमध्ये झालेल्या वाद आणखी चिघळला. काही वृत्तांनुसार, शहजाद पूनावालासोबत झालेल्या शारीरिक झटापटीच्या घटनेनंतर सिवेत तोमरला शोमधून काढून टाकण्यात आले आहे.  याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या झटापटीनंतर पूनावालाच्या टीमने एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिलं गेले की, ” शहजादने लहानपणीच आपले वडील गमावले आणि आता त्याची आई वृद्ध होत आहे. वैचारिक मतभेदांमुळे त्याचे त्याच्या भावासोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. शहजाद आपल्या  उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमवायला गेला आहे, परंतु त्याला पाठीमागून शाब्दिक शिवीगाळ आणि शारीरिक हल्ल्याला सामोरे जावे लागले.”

Follow Us
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?