AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला तुझ्या प्रेमाची गरज, तुझ्याशिवाय.. प्रसिद्ध अभिनेत्रीची समय रैनासाठी खास पोस्ट, मनातलं सगळंच सांगितलं..

'India's Got Latent' हा शो आणि समय रैना नेहमी चर्चेत असतात. आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने या शोबद्दल आणि समय रैनाबद्दल खास पोस्ट लिहीत या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे. कोण आहे ती अभिनेत्री ? काय लिहीलं तिने ?

मला तुझ्या प्रेमाची गरज, तुझ्याशिवाय..  प्रसिद्ध अभिनेत्रीची समय रैनासाठी खास पोस्ट, मनातलं सगळंच सांगितलं..
| Updated on: Sep 26, 2026 | 9:55 PM
Share

‘India’s Got Latent’ आणि समय रैना हे दोघेही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यात केलेल्या विधानामुळे समय रैना कित्येकदा अडचणीत सापडला आहे. पहिल्या सीझनमधये झालेले वाद चर्चेत असतानाच समय या शोचा दुसरा सीझन घेऊनआला. तेथेही एका भागात काश्मिरी पंडितांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यातच आता, आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा समय रैना आणि त्याच्या या शोची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेल्या एका मिश्कील पोस्टमध्ये तिने थेट ‘India’s Got Latent’ आणि त्यात सहभागी झालेल्या दीपक कलाल यांचा संदर्भ दिला आहे. तिच्या या पोस्टनंतर शर्लिनला समय रैनाच्या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

शर्लिन चोप्राच्या पोस्टमध्ये समय रैनाचा उल्लेख

समय रैनाचा ‘India’s Got Latent’ हा शो आपल्या हटके आणि अनोख्या कंटेंटसाठी सोशल मीडियावर चर्चेत राहिलाय. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यात दीपक कलाल यांचाही समावेश होता. दीपक कलाल यांच्या शोमधील उपस्थितीची आणि त्यांच्या अंदाजाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता याच दीपक कलालचा संदर्भ देत अभिनेत्री शर्लिन चोप्राने एक पोस्ट केली आहे. शर्लिनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाली शर्लिन चोप्रा ?

शर्लिन चोप्राने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “दीपक कलालजींसारख्या महापुरुषाला तुम्ही आपल्या कौटुंबिक शोमध्ये बोलावून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. या सुंदर आणि सुशील प्राण्यालाही तुमच्या प्रेमाची गरज आहे… 😛 आता तर राहवतही नाही आणि सहनही होत नाही…”  शर्लिनच्या या पोस्टचा अंदाज पाहता तिने ही पोस्ट मिश्कील आणि उपरोधिक पद्धतीने केली असल्याचं दिसतं. मात्र, दीपक कलालचा उल्लेख करत तिने समय रैनाच्या शोचा संदर्भ दिल्यामुळे तिच्या या पोस्टने वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

शर्लिनने आपल्या पोस्टमध्ये थेट ‘मला शोमध्ये बोलवा’ असं म्हटलेलं नाही. मात्र, तिच्या पोस्टचा संदर्भ आणि त्यातील मजेशीर अंदाज पाहता ती ‘India’s Got Latent’मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहे का? असा प्रश्न सोशल मीडिया यूजर्सकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे, शर्लिनने समय रैना यांच्या शोला ‘कौटुंबिक शो’ असा मिश्कील उल्लेख करत दीपक कलाल यांचं उदाहरण दिलं आहे. त्यामुळे तिची पोस्ट ही केवळ विनोद म्हणून करण्यात आली आहे की त्यामागे खरंच शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

नेटकऱ्यांकडून समय रैनाला विनंती

शर्लिन चोप्राच्या पोस्टनंतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मजेशीर कमेंट्स करत शर्लिनच्या पोस्टला दाद दिली, तर काही युजर्सनी थेट समय रैनाला टॅग करत तिला ‘India’s Got Latent’मध्ये बोलावण्याची मागणी केली आहे. दीपक कलाल आणि शर्लिन चोप्रा हे दोघेही आपल्या हटके आणि बेधडक सोशल मीडिया अंदाजासाठी ओळखले जातात. त्यामुळे दीपकचा संदर्भ देत शर्लिनने समय रैनाच्या शोबाबत केलेली ही पोस्ट नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

कोण आहे शर्लिन चोप्रा ?

शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल असून, ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे तसेच सोशल मीडिया पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असते. हैदराबादमध्ये जन्मलेल्या शर्लिनने मनोरंजनसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2005 साली ‘टाइमपास’ या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.अभिनयासोबतच शर्लिनने छोट्या पडद्यावरही आपली छाप पाडली . लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या पर्वात ती सहभागी झाली होती. याशिवाय एमटीव्हीच्या चर्चित ‘स्प्लिट्सविला’ या कार्यक्रमातही शर्लिनने सहभाग घेतला होता. आपल्या बिनधास्त आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे ती सोशल मीडियावरही कायम चर्चेत असते.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?