
लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सरचा पाचवा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चार वर्षांच्या विश्रांतीनंतर, या शोमध्ये प्रतिभावान तरुण डान्सर स्टेजवर थिरकताना दिसतील आणि प्रेक्षकही या शओसाठी उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. डान्स रिअॅलिटी शोचा पाचवा सीझनचा जुलैमध्ये या आठवड्याच्या शेवटी प्रीमियर होईल आणि शूटिंगही सुरू आहे. सुपर डान्सरमध्ये लोकप्रिय जज म्हणून शिल्पा शेट्टी असणारच आहे. शिल्पाची या शोसाठी शुटींग देखील सुरु झाली आहे.
शिल्पाने पापाराझीला दिली चांगलीच तंबी
शिल्पा शूटिंगच्या दिवशी नेहमीप्रमाणे सेटवर दिसली. सुंदर गुलाबी राजस्थानी लेहेंगा परिधान केलेली, अभिनेत्री एका एपिसोडच्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचली होती आणि अर्थातच तिला पाहताच सर्व पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी तिथे हजर होते. पण यावेळी एका पापाराझीला शिल्पा चांगलीच तंबी दिलेली पाहायला मिळाली तेही त्याच्या तंबाखू खाण्यावरून. शिल्पाचा हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
‘तू इकडे ये आधी मला तुझं तोंड पाहायचं आहे’
सेटवर प्रवेश करण्यापूर्वी, शिल्पा फोटोसाठी पोज देत असाताना अचानक तिने एका पापाराझीला बोलावलं. म्हणाली ‘तू इकडे ये आधी मला तुझं तोंड पाहायचं आहे. ‘शिल्पा बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींकडे वळली आणि त्याच्याकडे चालू लागली. शिल्पाने त्याला त्याचं तोंड उघडण्यास सांगितलं. पण त्या पापाराझीने हाताने स्वत:चं तोंड झाकून घेतलं. आणि शिल्पाला सांगितलं की त्याने तंबाखू खाणे सोडून दिलं आहे.
शिल्पाने पापाराझीला पुन्हा तंबाखू न खाण्याचा इशारा दिला.
पण त्यावेळी त्याचे मित्र त्याला चिडवू लागले. ते शिल्पाला सांगत होते की तो फिल्म सिटीच्या बाहेर तो तंबाखू खातो आणि तो त्याच्या सामानात ती पूडी ठेवून देतो. त्यावर शिल्पा हसली आणि म्हणाली, “हे कसले मित्र आहेत?” तसेच आत जाण्यापूर्वी, शिल्पाने पापाराझीला पुन्हा तंबाखू न खाण्याचा इशारा दिला. ती म्हणाली “तंबाखू खाणे बंद कर. नाही खायची अजिबात” त्यावर त्या पापाराझीने देखील होकारार्थी मान हालवली. त्यानंतर मग शिल्पा शुटसाठी सेटवर गेली.
सुपर डान्सर चॅप्टर 5 मध्ये, शिल्पा शेट्टीसोबत गीता कपूर आणि कोरिओग्राफर मर्जी पेस्टनजी जज म्हणून असणार आहे. मर्जी पहिल्यांदाच अनुराग बसूंच्या जागी शोमध्ये दिसणार आहे.