'अवकातीत राहा, माझा नवरा आहेस', अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पतीला कानशिलात

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या पतीच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Shilpa Shetty slapped Raj Kundra).

'अवकातीत राहा, माझा नवरा आहेस', अभिनेत्री शिल्पा शेट्टीची पतीला कानशिलात

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे (Shilpa Shetty slapped Raj Kundra). यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडोओत शिल्पा शेट्टी तिच्या पतीला म्हणजेच राज कुंद्राला कानशिलात लगावताना दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे (Shilpa Shetty slapped Raj Kundra).

टीकटॉकवर आता अनेक सेलिब्रिटीही सक्रीय आहेत. बॉलिवूडचे बरेच अभिनेता-अभिनेत्री आता टीकटॉकवर व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीही टीकटॉकवर प्रचंड सक्रीय असते. शिल्पाच्या पाठोपाठ आता राज कुंद्राही तीन महिन्यांपूर्वी सक्रीय झाला. तोही अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, त्याने यावेळी शेअर केलेल्या व्हिडीओत शिल्पाने त्याच्या कानशिलात लगावली आहे.

खरंतर हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सर्वजण राज कुंद्राचे तीन महिन्यात एक मिलियन (दहा लाख) फॉलोअर्स झाल्याने आश्चर्य व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे कॉमेडीयन कपिल शर्मा, अभिनेता रितेश देशमुख, आर. माधवन सारखे अनेक जण यात आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर राज कुंद्रा ‘न हम अमिताभ, न दिलीप कुमार, न किसी हिरो के बच्चे’ असं गाणं म्हणत थिरकताना दिसत आहे. गाण्याच्या सरत्याशेवटी शिल्पा शेट्टी येऊन राजच्या कानशिलात लगावते आणि ‘अवकातीत राहा, माझा नवरा आहेस’, असं म्हणते.

शिल्पा बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. तिने भरपूर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, तरीही तिचा पती राज कुंद्राचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. तो या लाईमलाईटपासून दूर राहणंच जास्त पसंत करतो. मात्र, तीन महिन्यांपासून तो टीकटॉकवर सक्रीय झाला. तीन महिन्यात त्याचे टीकटॉकवर तब्बल एक मिलियन (दहा लाख) फॉलोअर्स झाले आहेत. याच गोष्टीच्या आनंदातून त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पाने बिझनेसमन राज कुंद्रासोबत लगीनगाठ बांधली. राज आणि शिल्पा ‘आयपीएल’मधील ‘राजस्थान रॉयल्स’ क्रिकेट संघाचे मालक आहे.

बॉलिवूड थ्रिलर ‘बाजीगर’ चित्रपटातून शिल्पाने 1993 मध्ये सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘गॅम्बलर’, ‘औझार’, ‘धडकन’ असे एकापेक्षा एक हिट चित्रपट तिने केले. ‘मै आई हू यूपी बिहार लूटने’ या गाण्यातील अदांनी शिल्पाने अनेकांना घायाळ केलं.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’नंतर शिल्पा बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही. तरीही शिल्पाचे फिटनेस व्हिडीओ आणि रॅम्पवॉक लक्ष वेधून घेतात. या वर्षी ‘निकम्मा’ चित्रपटातून तब्बल 13 वर्षांनी शिल्पा पुनरागमन करत आहे. (Shilpa Shetty becomes Mother again)

संबंधित बातम्या :

शिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर फसवणूक केल्याची तक्रार दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *