AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई

15 फेब्रुवारी 2020 रोजी आपल्या मुलीचा जन्म झाल्याची घोषणा शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवरुन केली आहे

शिल्पा शेट्टी 44 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 21, 2020 | 12:42 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. दुसऱ्यांदा मातृत्वसुख अनुभवताना 44 वर्षीय शिल्पा शेट्टीने सरोगसीचं माध्यम निवडलं. शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या मुलीचा गेल्या आठवड्यात जन्म झाला. (Shilpa Shetty becomes Mother again)

15 फेब्रुवारी 2020 रोजी आपल्या मुलीचा जन्म झाल्याची घोषणा शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवरुन केली आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शिल्पाने चिमुकलीच्या बोटांचा फोटो शेअर करुन ही गूड न्यूज चाहत्यांना दिली. ‘समिषा’ असं बाळाचं नामकरणही करण्यात आलं आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पाच्या बेबी बम्पचे फोटो दिसले नसताना अचानक बाळाच्या जन्माची बातमी आल्याने चाहतेही काही क्षण बुचकळ्यात पडले. शिल्पाच्या सोशल मीडिया अकाऊण्टवर चाहते आणि बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

‘ओम श्री गणेशाय नमः आमच्या प्रार्थनांना चमत्काराच्या रुपाने उत्तर मिळालं. आम्ही नन्ही परी समिषा शेट्टी कुंद्रा हिच्या आगमनाची बातमी जाहीर करताना शहारलो आहोत. 15 फेब्रुवारी 2020 रोजी जन्म. ज्युनिअर एसएसके घरात आली आहे’ असं शिल्पाने लिहिलं (Shilpa Shetty becomes Mother again) आहे.

समिषा या नावाचा अर्थही शिल्पाने उलगडून सांगितला आहे. ‘संस्कृतमध्ये ‘स’ म्हणजे सहित. रशियन भाषेत ‘मिषा’ म्हणजे देवासम. तू तुझ्या नावाप्रमाणेच लक्ष्मी माता आहेस. तू आपलं कुटुंब परिपूर्ण केलंस. तुमचे, राज आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा, आनंदी भाऊ विआन राज कुंद्रा’ अशा भावना शिल्पाने व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

|| Om Shri Ganeshaya Namah || Our prayers have been answered with a miracle… With gratitude in our hearts, we are thrilled to announce the arrival of our little Angel, ???????? ?????? ??????? Born: February 15, 2020 Junior SSK in the house? ‘Sa’ in Sanskrit is “to have”, and ‘Misha’ in Russian stands for “someone like God”. You personify this name – our Goddess Laxmi, and complete our family. ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀ ~ Please bestow our angel with all your love and blessings??❤ ~ Ecstatic parents: Raj and Shilpa Shetty Kundra Overjoyed brother: Viaan-Raj Kundra . . . . . . . . . #SamishaShettyKundra? #gratitude #blessed #MahaShivratri #daughter #family #love

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

22 नोव्हेंबर 2009 रोजी शिल्पाने बिझनेसमन राज कुंद्रासोबत लगीनगाठ बांधली. राज आणि शिल्पा ‘आयपीएल’मधील ‘राजस्थान रॉयल्स’ क्रिकेट संघाचे मालक आहे. 2012 मध्ये शिल्पाने मुलगा विआन कुंद्राला जन्म दिला.

बॉलिवूड थ्रिलर ‘बाजीगर’ चित्रपटातून शिल्पाने 1993 मध्ये सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मै खिलाडी तू अनाडी, गॅम्बलर, औझार, धडकन असे एकापेक्षा एक हिट चित्रपट तिने केले. ‘मै आई हू यूपी बिहार लूटने’ या गाण्यातील अदांनी शिल्पाने अनेकांना घायाळ केलं.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपने’नंतर शिल्पा बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही. तरीही शिल्पाचे फिटनेस व्हिडीओ आणि रॅम्पवॉक लक्ष वेधून घेतात. या वर्षी ‘निकम्मा’ चित्रपटातून तब्बल 13 वर्षांनी शिल्पा पुनरागमन करत आहे. (Shilpa Shetty becomes Mother again)

हेही वाचा पाच वर्षांचं रिलेशनशीप, रिचा चढ्ढा-अली फजलच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

Follow Us
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA...
NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA....
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने...
मुख्यमंत्र्यांच्या मुंबईते शिर्डी प्रवासादरम्यानच्या त्या कृत्याने....
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या..
धक्कादायक! थेट घरात घुसून 25 वर्षीय महिलेचा विनयभंग अन्... नाशिकच्या...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प...
मोठी खळबळ! घराचा नकाशा, संवेदनशील माहिती अन्... थेट डॉनाल्ड ट्रम्प....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती...
देशभरात 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ, किती रुपयांवर
देशभरात 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ, किती रुपयांवर.
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...