AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor | ब्रेकअपनंतर श्रद्धा कपूरला भेटला नवीन बॉयफ्रेंड; ‘या’ हँडसम हंकला डेट करतेय अभिनेत्री

श्रद्धाने 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र 'आशिकी 2' या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. यामध्ये तिने आदित्य रॉय कपूरसोबत भूमिका साकारली होती. यावेळी आदित्य आणि श्रद्धाच्या डेटिंगच्या चर्चा होत्या.

Shraddha Kapoor | ब्रेकअपनंतर श्रद्धा कपूरला भेटला नवीन बॉयफ्रेंड; 'या' हँडसम हंकला डेट करतेय अभिनेत्री
Shraddha Kapoor and Rahul ModyImage Credit source: Youtube
| Updated on: Jul 05, 2023 | 3:52 PM
Share

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडमधल्या इतर अभिनेत्रींपेक्षा फार वेगळी आहे असं समजलं जातं. श्रद्धा जेव्हा कधी सार्वजनिक ठिकाणी पापाराझींना दिसते, तेव्हा तिच्या स्वभावातील आणि पोशाखांमधील साधेपणा चाहत्यांना खूप भावतो. श्रद्धाचा सोशल मीडियावरही खूप मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या चित्रपटांसोबतच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. नुकतीच तिने ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत भूमिका साकारली. रणबीर आणि श्रद्धाची नवीन जोडी प्रेक्षकांनाही फार आवडली. त्यानंतर आता श्रद्धाच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाल्याचं कळतंय. कारण नुकतंच तिला ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाचा लेखक राहुल मोदीसोबत ‘मूव्ही डेट’वर जाताना पाहिलं गेलं. त्यामुळे श्रद्धाच्या आयुष्यात नवीन प्रेम आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लेखक राहुल मोदीसोबत श्रद्धा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. यावेळी पापाराझींनी दोघांना कॅमेऱ्यात कैद केलं. राहुल आणि श्रद्धाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघांच्या डेटिंगचा अंदाज लावला. याआधी श्रद्धा फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला चार वर्षांपर्यंत डेट करत होती. मात्र 2022 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. राहुल आणि श्रद्धाची पहिली भेट ही ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या सेटवरच झाली. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.

श्रद्धाने 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र ‘आशिकी 2’ या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. यामध्ये तिने आदित्य रॉय कपूरसोबत भूमिका साकारली होती. यावेळी आदित्य आणि श्रद्धाच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. मात्र या दोघांचं नातं श्रद्धाच्या आईला पसंत नव्हतं, असं म्हटलं जातं. श्रद्धाचं अभिनेता फरहान अख्तरसोबतचं अफेअर सर्वाधिक गाजलं होतं. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहत होते, अशीही चर्चा होती. इतकंच नव्हे तर तिचे वडील शक्ती कपूर हे तिला फरहानच्या घरातून जबरदस्तीने घेऊन गेले, असंही म्हटलं जातं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.