AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार

श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात त्यांची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

श्री साटम महाराजांची जीवनगाथा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार
श्री साटम महाराज यांची जीवनगाथा पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपाने Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2026 | 2:34 PM
Share

कोकणभूमीत परमपूज्य असलेल्या श्री साटम महाराज यांची जीवनगाथा पहिल्यांदाच चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज’ असं या चित्रपटाचं नाव असून, प्रेक्षकांना अध्यात्माचा परिपूर्ण अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. महाकाली प्रॉडक्शन, स्मिता क्रिएशन यांनी दाणोलीश्वर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मिलिंद सावंत, सुषमा मिलिंद घोगळे सावंत, स्मिता घाग चित्रपटाचे निर्माता, रणजित विठ्ठल चव्हाण सहनिर्माता आहेत. कमलवल्लभदास यांनी लिहिलेल्या ‘दाणोलीश्र्वर’ या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पराग कुलकर्णी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. विराज राजे हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

समर्थ शंकर साटम महाराजांचा जन्म 1884 साली अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाला. मुंबईतून एका सामान्य व्यक्तीसारखा सुरू झालेला त्यांचा प्रवास अलौकिक ठरला. भारतभ्रमण करून त्यांची आध्यात्मिक पावले कोकणातील पावन भूमीकडे वळली. सावंतवाडी जवळील दाणोली या गावात महाराजांचा हा दिव्य प्रवास स्थिरावला. सन 1937 पर्यंत त्यांनी आपल्या वास्तव्यात अनेक लीला आणि चमत्कार घडवले. संकटात सापडलेल्या लाखो भाविकांचे प्रपंच सावरून त्यांना सन्मार्ग दाखवला. आपल्या सहज वागण्यातून समाजाला मानवी जीवनाचे अंतिम सार, मूल्ये शिकवली. दाणोली नगरीत समाधी घेऊन त्यांनी ही भूमी कायमस्वरूपी पावन करून ठेवली. आजही त्यांच्या भक्तांमध्ये त्यांच्याविषयी मोठी श्रद्धा आहे. आता ‘दाणोलीश्वर : सद्गुरू श्री साटम महाराज’ या आगामी मराठी चित्रपटातून त्यांचं जीवनकार्य आणि आध्यात्मिक वारसा मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

साटम महाराजांची अथांग शिकवण आणि जीवनगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दाणोलीश्वर या चित्रपटातून करण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक विराज राजे यांनी सांगितलं. या चित्रपटात कलाकार कोण कोण आहेत? साटम महाराजांची मुख्य भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. आजवर साधू-संत, दैवी शक्ती असलेल्या व्यक्तीमत्त्वांवर मराठीमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले. त्यात आता दाणोलीश्वर साटम महाराजांवरील चित्रपटाची भर पडणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण केलं आहे.

Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल