Bollywood Corona | कलाकारांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट, आदित्य नारायण-श्वेतालाही कोरोनाची लागण!

आदित्यने पत्नीसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. आदित्यने त्यांच्या हनीमूनदरम्यानचा श्वेतासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे

Bollywood Corona | कलाकारांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट, आदित्य नारायण-श्वेतालाही कोरोनाची लागण!
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 6:15 PM

मुंबई : मुंबईत कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. बरेच सेलेब्रिटीही या विषाणूच्या संसर्गाला बळी पडत आहेत. गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेतासुद्धा (Shweta  Agarwal) या यादीमध्ये सामील झाले आहेत. आदित्यने पत्नीसह एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. आदित्यने त्यांच्या हनीमूनदरम्यानचा श्वेतासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे (Singer Aditya Narayan and Shweta agarwal tested corona positive).

फोटो शेअर करण्याबरोबरच आदित्यने लिहिले की, ‘सर्वांना नमस्कार, माझा आणि माझी पत्नी श्वेता अग्रवाल हिचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. आम्ही दोघे क्वारंटाईन झाले आहोत. कृपया काळजी घ्या आणि सुरक्षित रहा आणि आमच्यासाठी प्रार्थना करा.’

आदित्यच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्रिटीसुद्धा कमेंट करून, त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा देत आहेत. गायिका नेहा कक्कर हिने देखील आदित्यच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

पाहा आदित्यची पोस्ट

शोचे शूटिंग थांबवले

आदित्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तो होस्ट करत असलेल्या ‘इंडियन आयडॉल 12’ या शोचे शूटिंग तत्काळ थांबवण्यात आले आहे. आता टीममधील सर्व सदस्यांची कोव्हिड टेस्ट होणार आहे. तोपर्यंत शोचे सर्व जज आणि उर्वरित टीम मेंबर यांना अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे (Singer Aditya Narayan and Shweta agarwal tested corona positive).

विशाल दादलानीने घेतली कोरोना लस

या शोचे परीक्षक विशाल दादलानी यांनी 1 एप्रिल रोजी कोरोन लस घेतली होती. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी एक अपडेट देखील केली होती. विशालने शुक्रवारी ट्विट केले की, ‘काल मला कोव्हिड लसीचा पहिला डोस मिळाला. लीलावती रुग्णालयात सुयोग्य समायोजन केले आहे. अद्याप या लसीचा काही दुष्परिणाम झालेला नाही. लसीचे इंजेक्शन टोचल्यामुळे खांद्यावर थोडीशी वेदना होते आहे.’

टीव्ही कलाकारांना कोरोनाची लागण

टीव्ही कलाकारांबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच कलर्सच्या मोलक्की सीरियलमधील मुख्य कलाकार तोरल रसपुत्र, अमर उपाध्याय, प्रियाल महाजन, तसेच भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा, अभिनेता अंकित सिवाच आणि तारक मेहता फेम मंदार चांदवडकर या कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे.

या व्यतिरिक्त डान्स शो ‘डान्स दिवाने 3’ च्या सेटवर तब्बल 18 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर सेटवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. या शोची परीक्षक अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने स्वतःची कोव्हिड टेस्ट देखील केली होती, ज्यात तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु, सेटवर बरेच लोक कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्यानंतर माधुरीने शोमधून ब्रेक घेतला आणि ती फॅमिलीसमवेत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदीवला रवाना झाली आहे.

(Singer Aditya Narayan and Shweta agarwal tested corona positive)

हेही वाचा :

PHOTO | सिल्व्हर शिमरी ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हाय गर्मी..’

Jeev Zala Yedapisa  | तब्बल 5 भाषांमध्ये अनुवाद, छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.