AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subodh Bhave Vaccine | पत्नीसमवेत अभिनेता सुबोध भावेंनी घेतली कोरोनाची लस, चाहत्यांना केले आवाहन…

अभिनेते सुबोध भावे यांनी पत्नी मंजिरीसमवेत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासंदर्भातील माहिती देताना त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

Subodh Bhave Vaccine | पत्नीसमवेत अभिनेता सुबोध भावेंनी घेतली कोरोनाची लस, चाहत्यांना केले आवाहन...
मंजिरी आणि सुबोध भावे
| Updated on: Apr 02, 2021 | 3:27 PM
Share

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू वेगाने फैलावत आहे. या विषाणूला वेळीच रोखण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे. सध्या देशात कोरोना लसीकरणाची मोहीमही वेगाने सुरु आहे. वयाची 45 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस प्राथमिकतेने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशावेळी अनेक कलाकार देखील कोरोना लस घेऊन, चाहत्यांनाही या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे (Actor Subodh Bhave took corona vaccine with wife Manjiri).

अभिनेते सुबोध भावे यांनी पत्नी मंजिरीसमवेत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासंदर्भातील माहिती देताना त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी समवेतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

पाहा सुबोध भावे यांची पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

‘लस घेतली तरी काळजी घ्यायची आहे’, असे कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. यावेळी सुबोध भावे यांच्यासह त्यांची पत्नी मंजिरी यांनी देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. पण, लस जरी घेतली असली तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन सुबोध भावे त्यांच्या चाहत्यांना करत आहेत. सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लस घेतल्याची माहिती दिली (Actor Subodh Bhave took corona vaccine with wife Manjiri).

सुबोध भावे आणि परिवाराला झालेली कोरोनाची लागण!

सुबोध भावे यांच्यासह त्यांची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या दुसऱ्या मुलाला मल्हारला मात्र कोरोनाची लागण झाली नव्हती. तिघांनीही स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले होते. त्यावेळीही त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहचवली होती.

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

राज्यात कोरोना रुग्णांचा कहर पाहायला मिळत आहे. काल तब्बल 43 हजार 183 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दररोज 7 ते 8 हजार कोरोनाबाधित आढळत आहे. तसेच मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या 1 मार्च 2021 मध्ये 9 हजार 690 कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. तर, काल 1 एप्रिलला महिनाभरात ही संख्या तब्बल 55 हजार 005 वर पोहोचली आहे.  त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तसेच मुंबईत ठिकठिकाणी आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

(Actor Subodh Bhave took corona vaccine with wife Manjiri)

हेही वाचा :

Malaika Arora Vaccine | कोरोनाची लस घेतानाही दिसला मलायकाचा ग्लॅमरस अंदाज, पहिलाच डोस घेताना म्हणाली…

Amitabh Bachchan vaccine : बिग बी सहकुटुंब लसीकरणाला, मात्र ‘या’ कारणामुळे अभिषेकला लस घेता आली नाही!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.