AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saleel Kulkarni Corona | सर्वतोपरी काळजी घेऊनही टेस्ट पॉझिटिव्ह, गायक सलील कुलकर्णी कोरोनाबाधित

माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, असे आवाहन सलील कुलकर्णी यांनी केले आहे. (Saleel Kulkarni Corona Positive)

Saleel Kulkarni Corona | सर्वतोपरी काळजी घेऊनही टेस्ट पॉझिटिव्ह, गायक सलील कुलकर्णी कोरोनाबाधित
डॉ. सलील कुलकर्णी
| Updated on: Mar 30, 2021 | 7:25 AM
Share

मुंबई : गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सलील कुलकर्णी यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांच्यावर घरीच विलगीकरणात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, असे आवाहन सलील कुलकर्णी यांनी केले आहे. (Singer Saleel Kulkarni Tested Corona Positive)

सलील कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट

सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी covid-19 टेस्ट positive आली आहे. घरीच isolate करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार treatment सुरू केली आहे. गेल्या एका आठवड्यात जे जे भेटले त्यांना कल्पना असावी ह्या दृष्टीने ही पोस्ट.., असे त्यांनी फेसबुक पोस्टवर नमूद केले आहे.

राज्यात कोरोनाचा हाहा:कार

राज्यात गेल्या महिनाभरापासून पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह इतर शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रविवारपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नवे रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासांत 31 हजार 643 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 हजार 854 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान, कालपेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. मात्र रविवार असल्यामुळे कोरोना चाचण्याही कमी झाल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आजच्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 74 लाख 5 हजार 518 झाली आहे. त्यातील 2 कोटी 35 लाख 3 हजार 307 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 36 हजार 584 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण 54 हजार 283 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 888 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 561 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांपैकी 7 पुरुष तर 5 महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णाचा दर 85 टक्क्यांवर आलाय. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 53 दिवसांवर आला आहे. (Singer Saleel Kulkarni Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 643 नवे रुग्ण, 102 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

शिवसेना नेते रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.